कुटुंबीयांच्या आठवणीत बंदी झाले भावुक
By Admin | Updated: July 26, 2016 00:45 IST2016-07-26T00:45:36+5:302016-07-26T00:45:36+5:30
कळत न् कळत हातून गुन्हा घडला की, मानवाच्या जीवनात न पुसण्याजोगा डाग लागतो.

कुटुंबीयांच्या आठवणीत बंदी झाले भावुक
मन परिवर्तन सभा : जिल्हा कारागृहातील प्रकार, ३०० कैद्यांची कार्यक्रमाला उपस्थिती
भंडारा : कळत न् कळत हातून गुन्हा घडला की, मानवाच्या जीवनात न पुसण्याजोगा डाग लागतो. तो आयुष्यभरासाठी राहतो. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा पाट बदलू शकत नाही. असे असले तरी कैद्यांनी उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी वाहिल्यास अनेकांना त्यांच्यावर लागले डाग पुसून काढता येते. त्यामुळे भूतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करण्यासाठी मतपरिवर्तन करा, असे आवाहन मन परिवर्तन टिमने जिल्हा कारागृहातील कैद्यांना केले. यामुळे येथील सुमारे ३०० कैदी भावूक झाल्याचा प्रसंग शनिवारी घडला.
गुन्हेगार हे कठोर हृदयाचे किंवा निगरगट्ट असताता, अशी भावना आहे. मात्र, मनपरिवर्तन कार्यक्रमादरम्यान कैद्यांनाही नाजूक हृदय असते ही दिसून आले. कैद्यांचे डोळे पाणावले. आणि ही किमया केली मन परिवर्तन टिमचे अर्पन गोस्वामी, शेफान साईजन ईमॅतुल दास, मनिष गोस्वामी यांनी.
मन परिवर्तन टिमच्या वतीने भंडारा जिल्हा कारागृहात सुमारे ३०० कैदी विविध प्रकरणात सजा भोगत आहेत. अशा कैद्यांना समाज वेगळ्या नजरेने बघते. त्यांच्या कुटुंबियांना समाजाकडून हिनतेची वागणूक मिळते. त्यामुळे चुकून घडलेल्या किंवा जाणूनबुजून केलेल्या घटनेतील आरोपींनी भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करावा व यासाठी मन परिवर्तन सभा घेण्यात आली. मन परिवर्तन सभेत मान्यवरांनी कैद्यांनी आत्मपरीक्षण करावे व त्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित करा. मन परिवर्तन झाल्यास सर्व बदल आपोआप घडून येते. मनातील अशुध्दता काढून टाका, नकारात्मक विचार काढून टाका, चांगले विचार मनात आणा, अपराधी भावना काढून टाका, व्यसन करू नका, एक आदर्श व्यक्ती बना असे एम. एस. साईजन यांनी मार्गदर्शन केले. तर मनिष गोस्वामी यांनी, गुन्हेगारांना रडताना पाहिले असून गुन्हे करून काहीच मिळत नाही. फक्त वाट्याला दु:ख येते. यावेळी कैद्यांकडून गुन्हा न करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे, हर्षद अन्सारी, गितेश बोरकर, रीकसन वर्गिस, पोलीस उपनिरीक्षक मेगडे व कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)