बँकांची अरेरावी खपवून घेणार नाही
By Admin | Updated: October 29, 2015 01:10 IST2015-10-29T01:10:27+5:302015-10-29T01:10:27+5:30
पैशाने उणीव भरून निघत नाही. परंतु संकटाच्या वेळी तथा गरजूंना आपल्या पायावर उभे होण्याकरिता पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली.

बँकांची अरेरावी खपवून घेणार नाही
नाना पटोले : २५ लाभार्थ्यांना १८ लाखांचे धनादेश वितरित
तुमसर : पैशाने उणीव भरून निघत नाही. परंतु संकटाच्या वेळी तथा गरजूंना आपल्या पायावर उभे होण्याकरिता पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली. या योजनेत काही बँकाची अरेरावी करित असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही अरेरावी कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा खा. नाना पटोले यांनी दिला.
पंचायत समिती तुमसरच्या सभागृहात पंतप्रधान मुद्रा योजनेच्या २५ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती कविता बनकर होत्या. अतिथी म्हणून उपसभापती शेखर कोतपल्लीवार, भाजप नेते मो. तारिक कुरैशी, खंडविकास अधिकारी केशव गड्डाफोड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संजय पाठक, नागपूर विभागाचे प्रमुख खापर्डे आदी उपस्थित होते. यावेळी खा. नाना पटोले यांचे हस्ते १५ लाभार्थ्यांना १८ लाखाचे धनादेश वितरीत केले. यावेळी खा पटोले म्हणाले, शेवटचा घटक बँकींग व्यवस्थेशी जुळला पाहिजे. याकरिता कागदपत्रांचा ढिग बँकेला न सादर करता विविध गटात ५० घाटापासून १० लाखांचे कर्ज या योजनेअंतर्गत प्राप्त होतो. अपघाती विमा योजनेत तात्काळ आर्थिक मदत धनादेश देणारी एकमेव योजना असून जिल्ह्यात १५६९ लाभार्थ्यांना ५ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. जनधन योजनेत विना पैशांनी खाते उघडता येते. १ लाखांचा विमा संरक्षण आहे. शिशू योजना, किशोर योजना व तरूण योजना सुरू आहे. लाभार्थ्यांना बँकेत त्रास होत आहे, अशी तक्रार तारिक कुरैशी यांनी यावेळी केली. प्रास्ताविक संजय पाठक यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)