केळीचे पीक भुईसपाट
By Admin | Updated: June 19, 2014 23:40 IST2014-06-19T23:40:41+5:302014-06-19T23:40:41+5:30
जांब येथे मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. जांब गाव केळीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने जांब येथील केळीचे पिके भुईसपाट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

केळीचे पीक भुईसपाट
जांब येथील घटना : भरपाईची मागणी
जांब (लोहारा) : जांब येथे मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. जांब गाव केळीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने जांब येथील केळीचे पिके भुईसपाट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसापूर्वी आलेल्या तुफानी वादळाने रामभाऊ जावळकर यांच्या शेतातील जी ९ वाणीचे केळी पाऊण एकरातील केळी भुईसपाट झाले आहे तर राजेश हरिभाऊ पावडे यांचे शेतातील अर्धा एकरातील केळी तसेच दिवाकर बोरकर, चंद्रास थोरकर यांच्या शेतातील सुद्धा केळी वादळाने भुईसपाट केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. महागडी केळीची वाण खरेदी करून लागवड करण्यात आली होती. पण तुफानी वादळाने केळी भुईसपाट केल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. तरी कृषी विभागाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ईश्वर जावळकर, राजू पावडे, दिवाकर बोरकर, चंद्रहास थोरकर यांनी केली आहे. (वार्ताहर)