क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:24+5:302021-08-24T04:39:24+5:30

इंद्रपाल कटकवार २३ लोक ०३, ०४ के भंडारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात असलेल्या बॅडमिंटन हॉलची ...

Bad condition of badminton hall in the sports complex | क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था

क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था

इंद्रपाल कटकवार

२३ लोक ०३, ०४ के

भंडारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात असलेल्या बॅडमिंटन हॉलची दुरवस्था झाली आहे. हॉलची दुरवस्था बघता याची अवस्थाही सांस्कृतिक भावनासारखी होणार काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. उल्लेखनीय म्हणजे दुरुस्तीच्या नावावर बिल जोडले जातात. मात्र, कामे दिसत नसल्याची ओरड होत आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष घालतील काय, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे.

शहरातील क्रीडा संकुलात असलेला एकमेव बॅडमिंटन हॉल आता समस्येच्या गर्तेत सापडला आहे. या बॅडमिंटन हॉलमध्ये चार कोर्ट आहेत. यामध्ये खेळाडू नियमितपणे सराव करीत असतात. समस्येसंदर्भात बॅडमिंटन असोसिएशनने संबंधित यंत्रणेला अवगत केले होते. जिल्हा क्रीडा संकुल समिती, भंडाराच्या वतीने गतवर्षी येथील बॅडमिंटन हॉल कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्याबाबत निविदाही प्रसारित केली होती. सद्यस्थितीत पावसाळ्याच्या दिवसात या बॅडमिंटन कोर्टमध्ये ठिकठिकाणी पाणी साचत असून खेळाडू पाय घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या हॉलची त्वरित दुरुस्ती करावी, अशी खेळाडूंची एकमुखी मागणी आहे.

बॉक्स

अशा आहेत समस्या

जिल्ह्यातील एकमेव बॅडमिंटन हॉलची दुरवस्था झाली आहे. बॅडमिंटन हॉलमध्ये अनेक ठिकाणी पावसाचे पाणी पडते. पाणी साचल्यामुळे पाय घसरून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. बॅडमिंटन हॉलच्या शौचालयात अस्वच्छता आहे. घाण वासामुळे वातावरण दूषित होत असते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. विशेष म्हणजे महिलांसाठीही येथे शौचालयाची व्यवस्था नाही तसेच त्यांच्यासाठी चेंजिंग रूमसुद्धा नाही. हॉलच्या बाहेर तर घाणच घाण पसरली आहे. लहान - मोठी झुडपे व गवत वाढलेले आहे. पाऊस आल्यावर हॉलच्या सेंटरमधून कोर्टवर पाणी येते. बॅडमिंटन नेट अतिशय खराब झाली असून, कोर्टच्या सभोवती असलेली मॅटही खराब अवस्थेत आहे. नियमितपणे सकाळ - संध्याकाळी खेळण्यापूर्वी स्वच्छता होत नाही. बॅडमिंटन कोर्टवर इलेक्ट्रिक पथदिव्यांचा प्रकाशही अपूर्ण आहे. या सर्व समस्यांमुळे खेळाडू सुविधांपासून वंचित आहेत.

Web Title: Bad condition of badminton hall in the sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.