नि:शस्त्रीकरणावर जागरुकता व्हावी
By Admin | Updated: August 13, 2014 23:40 IST2014-08-13T23:40:16+5:302014-08-13T23:40:16+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु असून जागतिक शांतता लोप पावत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी निशस्त्रीकरणावर आधारीत कार्यशाळांमध्ये

नि:शस्त्रीकरणावर जागरुकता व्हावी
भंडारा : आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु असून जागतिक शांतता लोप पावत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी निशस्त्रीकरणावर आधारीत कार्यशाळांमध्ये सहभाग होऊन जागरुकता निर्माण करावी, असे प्रतिपादन नागपूर येथील सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक अध्ययन केंद्राचे सचिव जे नारायणराव यांनी व्यक्त केले.
येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात आयोजित समाजविज्ञान अभ्यासमंडळातर्फे कार्यक्रमात ते बोलत होते. कायशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.कार्तिक पणीकर, डॉ.अमोल पदवाड, प्रा.डॉ. प्रदीप मेश्राम, प्रा.अनिल भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते जे नारायणराव म्हणाले, राष्ट्रांनी युद्ध टाळण्यासाठी नितीचा योग्य वापर केला पाहिजे. त्यांनी कोणत्या देशाची निती कशाकशावर अवलंबून आहे यावर प्रकाश टाकला. तसेच मोठ्या राष्ट्रांचे उदाहरण देऊन जागतिक शांततेबाबद तरुणाईला आवाहन करून त्या दिशेने काम करण्याचे सांगितले.
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा.डॉ.अमोल पदवाड यांनी तर संचालन प्रा.अनिल भांडारकर यांनी केले. आभार डॉ.प्रदीप मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)