लाखनी पंचायत समितीला महाआवास अभियानात पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:26+5:302021-08-24T04:39:26+5:30
लाखनी : ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे याकरिता घरकूल आवास योजना सुरू केली आहे. ...

लाखनी पंचायत समितीला महाआवास अभियानात पुरस्कार
लाखनी : ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे याकरिता घरकूल आवास योजना सुरू केली आहे. अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व मागासवर्गीय तथा इतर प्रवर्गास प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल उपलब्ध केले जाते. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत रमाई घरकूल १५०५, शबरी घरकूल ५१७, प्रधानमंत्री घरकूल ५७०५ अशी एकूण ७८२७ घरकूूल मंजूर करण्यात आली. त्यापैकी अनुक्रमे १०३२, २८३, ३४४५ अशी एकूण ४७४९ पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकूल प्रगतीपथावर आहेत. ही घरकूल मंजुरीसाठी ग्रामपंचायतपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेपर्यंतची सर्व कार्यालयीन कामे गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांचे मार्गदर्शनात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राजेंद्र कानडे, संबंधित गृहनिर्माण अभियंत्यांनी पार पाडली असल्याचे एकलव्य हटनागर यांनी सांगितले. दिघोरी ग्रामपंचायतीने ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एकलव्य हटनागर यांचे मार्गदर्शनात प्रधानमंत्री आवास योजनेची १४६ पैकी १०० घरकूल तथा रमाई आवास योजनेची ४० पैकी ३६ घरकूल पूर्ण केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडाराअंतर्गत पंचायत समिती लाखनीमार्फत महाआवास अभियान (ग्रामीण)मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्ह्यात तृतीय तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर जिल्ह्यात प्रथम, राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत दिघोरी ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम पुरस्कार संपादन केल्यामुळे स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री विश्वजित कदम यांचे हस्ते गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राजेंद्र कानडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता दुर्गेश पंचबुद्धे, दिघोरीचे सरपंच दुर्गा निरगुळे, ग्रामसेवक अमित चुटे, उपसरपंच विश्वनाथ नंदेश्वर यांना पुरस्कार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.