शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

नवीन विद्युत मीटर देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: November 15, 2014 01:19 IST

विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे.

काचेवानी : विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बरबरपुरा येथील मनोहर कनोजे यांचा मुलगा मनोज याला दुसऱ्या गावात वीज मीटर देण्यास विद्युत विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.मुकेश कनोजे याने काचेवानी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन घर तयार केला. हे घर त्यांच्या आईच्या नावे असून तेथे नवीन मीटर लावून वीज पुरवठा सुरू करण्यासंबंधीचे प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र तिरोडा विद्युत वितरणचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी अनावश्यक कारणे समोर करून मीटर देण्यास टाळाटाळ करीत आहेत.बरबसपुरा ग्रामपंचायत अंतर्गत जि.प. शाळेजवळ मुकेशचे वडील मनोहर कनोजे यांच्या नावे पक्के घर आहे. तेथे वडिलांच्या नावेच वीज मीटर होता. मात्र तत्कालिन उपकार्यकारी अधिकारी ए.व्ही. तुरकर यांनी तपासणी करून अनावश्यक ८२ हजार रूपये व कंपाऊंड चार्ज ३० हजार रूपये आकारले. हे प्रकरण गोंदियाच्या ग्राहक न्यायालयात सुरू आहे. मात्र सदर दोन्ही अधिकारी वडिलांच्या नावे असलेला अनावश्यक वीज आकार भरा, तेव्हाच नवीन घराला मीटर मिळेल, असे सांगत असल्याचा आरोप मुकेशने केला आहे. मुकेशने सांगितल्यानुसार, बरबसपुरा येथे वडिलांच्या नावे असलेला वीज आकार न्यायालयाच्या निर्णयानंतर ते भरतील. ती त्यांची जबाबदारी आहे. किंवा तो भुर्दंड त्यांच्या संपत्तीतून वसूल करावा. त्याला आपला विरोध नाही. मात्र काचेवानीच्या ग्रामपंचायत हद्दीतील नवीन घराचा संबंध त्यांच्याशी येत नाही. तरीसुद्धा सदर दोन्ही अधिकारी हेतूपुरस्पर नाकह त्रास देवून मीटर देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मुकेशने केला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी मीटर डिमांड दिले नाही आणि वीज पुरवठा सुरू केला नाही, तर मुकेश कनोजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)