Avoid dismissal even after transfer | बदलीनंतरही कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ

बदलीनंतरही कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार : बदल्यांना लोटला दीड महिन्यांचा कालावधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र दीड महिने लोटून यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. प्रशासनाच्या या कारभारामुळे जिल्हा परिषद वर्तूळात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तसेच एकाच विभागात पाच वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषद भंडाराकडून यावर्षीच्या जुलै व आगस्ट महिन्यामध्ये बदल्या करण्यात आल्या. बदल्या झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार अतितत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. परंतु अजूनही काही विभागांनी मर्जीतल्या काही कर्मचाºयांना एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटूनही कार्यमुक्त केलेले नाही. यावरून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून मनमर्जीने कारभार चालविला जात आहे. याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालून ज्या विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही कार्यमुक्त केले नाही, याबाबत संबधित विभाग प्रमुखांना विचारणा करून बदली झालेल्या कर्मचाºयांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे.
तसेच सर्व संवर्गाच्या पदोन्नती गत एक वर्षांपासून करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात जिल्हा प्रशासना विषयी नाराजीचा सूर वाढत आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नती न मिळता वेतन मिळत आहेत. त्यामुळे पदोन्नती करण्याने शासनावर कुठलाच आर्थिक ताण पडत नसतांही जिल्हा परिषद प्रशासन कर्मचाºयांचा विचार करतांनी दिसून येत नाही. आधीच कर्मचारी वर्ग नियतवयोमानाने सेवानिवृत होत असल्यामुळे कर्मचारी वर्ग कमी होत आहे. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त काम इतर कर्मचाºयांना करावा लागत आहे. कामाचा व्याप जास्त झाल्यामुळे जनतेचे काम वेळेवर करण्यात अडचणी येत असल्याचे बोलले जाते. बहुतांश कर्मचारी शुगर, हाय बीपी व इतर आजाराने ग्रस्त आहेत. दोन ते तीन टेबलवरील कामाचा ताण आल्यामुळे अनेक कर्मचारी मृत्यू पावले आहेत.
त्यांच्या कुटूंबावर कमी वयातच आघात होत आहेत. प्रशासन कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिले तर कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होणार नाही. कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरविण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत आहे. एका कर्मचाऱ्यांना दोन ते तीन टेबलचा कार्यभार न देता तत्काळ पदोन्नती देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे . भंडारा जिल्हा परिषद एक शिस्त लावून एक आदर्श निर्माण केल्यामुळे मुख्य कार्यकारी यांचे कौतुक होत आहे. अनुकंपा भरती करून कर्मचारी रिक्त पद भरण्यात यावे, कर्मचाºयांवरील कामाचा ताण कमी करावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी विविध संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे .


अधिकारी-कर्मचाऱ्यांत कोरोनाची धास्ती
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कोरोना अंतर्गत ५० टक्के उपस्थिती ठेवण्यात यावी, असे आदेश आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीत अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांत कोरोनाची धास्ती वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबर आघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे.

पदोन्नती रखडली
पदोन्नती वेळेवर न झाल्यामुळे नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याचे कर्मचारी एमडीएस कॅडरमध्ये जेष्ठतेत कमी पडून मागे राहत आहेत. सर्व पात्रता असूनही पदोन्नती करण्यात का उशीर होत आहे, यामध्ये कोण कर्मचारी, अधिकारी दोषी आहेत, त्यांना जाब विचारून योग्य ती कार्यवाही करण्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. जिल्हा प्रशासनात काही कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचे बोलले जाते

Web Title: Avoid dismissal even after transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.