बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:17+5:302021-08-13T04:40:17+5:30

भंडारा येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित ‘संवाद यात्रे’दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव जय मेश्राम, जिल्हाध्यक्ष जागेश ...

Avenge Babasaheb's insult | बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घ्या

बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घ्या

भंडारा येथे बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित ‘संवाद यात्रे’दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव जय मेश्राम, जिल्हाध्यक्ष जागेश बांगर, उपाध्यक्ष सलीम पठाण, महिला संघटनच्या प्रिया शहारे, रेखा भुसारी, अरुणा चहांदे, दिनेश गेडाम, अविनाश वानखडे, जिल्हा प्रभारी एल. गजभिये, संजय नासरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲड. ताजने म्हणाले, भंडारा जिल्ह्यात पक्षाची ताकद बरीच आहे. केवळ संघटनात्मक सक्रियतेने ही सुप्त ताकद जागृत करता येईल. याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या गटांची जबाबदारी पदाधिकाऱ्यांना वाटून देण्यात आली आहे. येत्या १ ते ३ सप्टेंबरदरम्यान तिन्ही विधानसभा मतदारसंघात ‘कॅडर कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रशांत रामटेके यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना तसेच प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पार्टीत प्रवेश केला.

Web Title: Avenge Babasaheb's insult