अधिकृत आवारभिंत पाडली
By Admin | Updated: July 24, 2015 00:32 IST2015-07-24T00:32:27+5:302015-07-24T00:32:27+5:30
येथील चंडिका मंदिर परिसरातील बुधवारीपेठेतील आनंद बावनकर यांचे रितसर परवानगी घेवून केलेली आवारभिंत कोणतीही सूचना व नोटीस न देता

अधिकृत आवारभिंत पाडली
पवनी नगर परिषदेचा कारभार : आनंद बावनकर यांचा पत्रपरिषदेत आरोप
पवनी : येथील चंडिका मंदिर परिसरातील बुधवारीपेठेतील आनंद बावनकर यांचे रितसर परवानगी घेवून केलेली आवारभिंत कोणतीही सूचना व नोटीस न देता घरची सर्वच मंडळी बाहेरगावी गेली असताना १६ जूनला दुपारी १ वाजताचे दरम्यान पाडून पवनी नगर परिषद मनमानी कारभार करीत असल्याची पावतीच दिली असल्याचा आरोप पत्रपरिषदेत आनंद बावनकर यांनी केला.
बुधवारीपेठेत आनंद बावनकर यांची वडिलोपार्जीत मालकीचे घर सिट नं. ३१, सि.स.नं. ४२३६/२ क्षेत्र १७६.७ चौ.मी. असून या जागेवर बांधकाम करण्याकरीता त्यांनी न.प. दि. २ डिसेंबर २०१३ ला घर बांधकामाची परवानगी घेतली असून १ आॅक्टोंबर २०१४ ला दुसरा मजला व आवारभिंतीचे बांधकामाची रितसर परवानगी घेतली आहे. परवानगी घेतेवेळस बावनकर यांनी न.प. ला मंजूर नकाशासह कागदपत्राची पुर्तता केलेली होती. परंतू घराजवळीलच इसमाच्या खोट्या तक्रारीच्या आधारे घरमालकाचा कोणत्याही प्रकारचा विचारणा अथवा नोटीस न देताच घरचे सर्व मंडळीच्या अनुपस्थितीत आवारभिंत पाडली असून यात बावनकर यांचे लाखोचे नुकसान नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे झाल्यामुळे न.प.नी नुकसान भरपाई करुन दयावी अशी मागणी केली आहे. यात मकान मालकाचे आवारभिंतीत बसविण्यात आलेले दोन लोखंडी गेट, चार लोखंडी रेलींग तोडून कोणत्याही प्र्रकारचा पंचनामा न करता न.प. नी जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३०,२२१ रुपये असून आवारभिंत बांधकामाकरिता सिमेंट, रेत या स्वरुपात एकूण २,१०,००० चे नुकसान झाले आहे. पवनी शहरात मुख्य रस्त्यावर तसेच अन्यत्र अतिक्रमण केले असतानाही पालिकेने गावातील कोणतेच अतिक्रण न काढता व माझे घराचे बाजुला असलेले अतिक्रमण न काढता माझे आवारभिंतीचे बांधकाम हेतुपूरस्परपणे पालिकेकडून पाडण्यात आल्याचा आरोप करुन माझी झालेली नुकसान भरपाई करण्यात यावी अन्यथा मला न्याय मिळविण्याकरिता न्यायालयातून दाद मागावी लागेल, असेही आनंद बावनकर यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)