शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१४ ऑगस्टच्या क्रांतीने पेटविली स्वातंत्र्याची मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ला झंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण गणेश समरीत, सिहोराचे गोपीचंद पाटील यांनी यात भाग घेतला. त्यांना कारावास झाला.

ठळक मुद्देतुमसरमधील क्रांतीवीर : १४ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या गोळीबारात सहा जणांना आले होते वीरमरण

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सर्वत्र स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धगधगत होता. त्याचे लोण तुमसरपर्यंतही पोहचले होते. १० ऑगस्ट १९४२ रोजी १४ पुढाऱ्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. काहींना अटक झाली तर काही भूमीगत झाले. मात्र १४ ऑगस्ट रोजी तुमसरात मोठी मिरवणूक काढली. पोलिसांनी ही मिरवणूक अडवून लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला. या गोळीबारात सहा जणांना वीरमरण आले, तर शेकडो जखमी झाले. तेथूनच खऱ्या अर्थाने तुमसरात स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटली. शनिवारी १४ ऑगस्ट रोजी या लढ्यातील वीर क्रांतीकारकांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ला झंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण गणेश समरीत, सिहोराचे गोपीचंद पाटील यांनी यात भाग घेतला. त्यांना कारावास झाला. १९३० साली जंगल सत्याग्रहातही तुमसर आघाडीवर होते. चिंचोली येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. मात्र १४ ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारानंतर स्वातंत्र्याची मशाल आणखीनच धगधगली. १० ऑगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ पुढाऱ्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. अनेकजण भूमीगत झाले. १४ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी तुमसरात मिरवणूक काढली. हजारो नागरिक सहभागी झाले. सुरुवातीला पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर न्यायाधीश जयवंत यांनी गोळीबाराचा आदेश काढला. त्यावेळी गोळीबार करण्यात आला. त्यात श्रीराम धुर्वे, भद्दू लोंदासे, श्रीहरी फाये, पांडूरंग सोनवाल, भुवाजी बानोरे, राजाराम धुर्वे यांना वीरमरण आले. तर शेकडो कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी त्यांची अंत्ययात्रा काढण्यासही नकार दिला. मात्र म.पो. दामले व इतरांनी दिलेल्या इशाऱ्याने सर्व मृतदेह ताब्यात देण्यात आले. डोंगरलात अंत्यसंस्कार झाले.स्वातंत्र्यवीरांच्या गौरवाचे स्मरणभारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाºया शूरविरांचे तुमसर येथे स्मारक उभारण्यात आले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी राष्ट्रीय शाळेला भेट दिली. त्यांच्याच हस्ते शहीद स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर पंडीत मोतीलाल नेहरु, महात्मा गांधी, महात्मा भगवान दास, पंडीत सुंदरलाल, आचार्य कृपलानी, पट्टीभीसीतारामय्या, जयप्रकाश नारायण, प्रकाश, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाळगीळ आदींनी तुमसरला भेट देऊन येथील क्रांतीकारकांचा गौरव केला. तुमसर शहरातील हे शहीद स्मारक आज तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. १४ ऑगस्ट रोजी यानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण तुमसरातील नागरिक या स्मारकापुढे नतमस्तक होतात. तुमसर शहराने स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाला तोड नाही. त्याचा अभिमान आज प्रत्येक तुमसरकरांना आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन