चाॅकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 22:13 IST2022-03-05T22:12:35+5:302022-03-05T22:13:00+5:30
Bhandara News घराच्या समाेर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेला चाॅकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना भंडारा तालुक्यातील पलाडी येथे घडली.

चाॅकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न
भंडारा : घराच्या समाेर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेला चाॅकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना भंडारा तालुक्यातील पलाडी येथे घडली. याप्रकरणी आराेपी तरुणाला शनिवारी गुन्हा दाखल करून कारधा पाेलिसांनी अटक केली.
काक्या ऊर्फ समीर देवदास खाेब्रागडे (३२) रा. पलाडी असे आराेपीचे नाव आहे. पाच वर्षीय बालिका आपल्या घरासमाेर खेळत हाेती. त्यावेळी आराेपी काक्याने तिला चाॅकलेटचे आमिष दाखवून बांधकाम सुरू असलेल्या एका घरात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून कशीबशी ही मुलगी सुटली. या घटनेची माहिती तिने शुक्रवारी सायंकाळी आपल्या पालकांना दिली. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी कारधा पाेलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. पाेलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत अवघ्या १२ तासात शनिवारी आराेपी काक्या खाेब्रागडे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भादंवि ३७६ (१) (आय) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अधिक तपास पाेलीस निरीक्षक राजेशकुमार थाेरात करीत आहेत.