शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अल्पभूधारक शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:38 IST

चुल्हाड गावाचे हद्दीत असणाºया नालालगत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करताना अल्पभूधारक शेतकºयांची चक्क शेतीच गिळंकृत करण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्याला भूमिहिन करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केली असून आत्महत्याचा इशारा या कुटुंबियांनी दिला आहे.

ठळक मुद्देचुल्हाडात कंत्राटदाराचा प्रताप : शेतकरी म्हणतो, आत्महत्या करावी काय?

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड गावाचे हद्दीत असणाºया नालालगत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करताना अल्पभूधारक शेतकºयांची चक्क शेतीच गिळंकृत करण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्याला भूमिहिन करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केली असून आत्महत्याचा इशारा या कुटुंबियांनी दिला आहे.पावसाळा ऐन तोंडावर असल्याने कंत्राटदारास कामे पुर्ण करण्याची मोठी घाई गर्दी असल्याचे दिसून येत आहे. लघू पाठबंधारे विभाग मार्फत शेतकºयाचे विकास कार्यासाठी अनेक योजना शेतशिवारात सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजना पुर्णत्वाकडे नेताना शेतकºयांना मात्र विश्वासात घेण्यात आले नाही. देवरी देव येथील अल्पभूधारक शेतकरी रामदयाल अंबुले यांची चुल्हाड गावाचे हद्दीत नाला लगत ४० आर शेती आहे. याच शेतीच्या उत्पादनावर त्यांचे कुटुंबियाचे उदरनिर्वाह सुरू आहे. अल्पशेती असताना कुटुंबियाचे उदरनिर्वाहासाठी त्यांची मोठी धडपड आहे. या शिवाय येत्या काही दिवसात मुलीचे विवाह होणार असल्याने रामदयाल अंबुले हे विवाह कार्याचे तयारीत गुंतले आहे. याच संधीचा फायदा घेत मोटघरे नामक कंत्राटदाराने चक्क अल्पभूधारक शेतकरी अंबुले यांचे शेतीच्या १५ आर जागेत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. बंधारा बांधकामात शेती गिळंकृत करण्यात आल्याचे मोटघरे नामक कंत्राटदाराला शेतकरी कुटुंबियांनी विचारले असताना कंत्राटदाराने मुजोरी करित हाकलून लावले आहे. या शिवाय बांधकामाला अडवणूक केल्यास धमकी दिली आहे. यामुळे शेतकºयांचे शेतशिवारात कंत्राटदारांची कुकूमशाही सुरू झाली आहे. ४० आर शेती असताना १५ आर बंधारा बांधकामात कंत्राटदाराने गिळंकृत केली आहे. उर्वरित २५ आर शेतीचे भरवशावर सहा सदस्यांचे उदरनिर्वाह करताना अडचणीचे ठरणार आहे. सिमेंट प्लग बंधारा बांधकामाचे सुरूवात करताना मोटघरे नामक कंत्राटदाराला शेती गिळंकृत होत असल्याचे सांगण्यात आले होते. या शिवाय कामे थांबविण्याची विनंती शेतकºयांचे महिला सदस्यांनी केली होती. शहरात १ फुट जागा कुणी सोडत नाहीत. परंतु या शेतात चक्क ०.१५ आर शेती बंधारा बांधकामात दिशेनाशी करण्यात आली आहे, असे असताना अन्य शेतकऱ्यांची शेती वगळण्यात आली आहे. बंधारा बांधकामाला विरोध नाही. परंतु नाल्याची जागा सोडून याच शेतकऱ्यांची शेतीत बंधारा बांधकामास सुरूवात करण्यात आली. रामदयाल अंबुले आणि अशोक पटले या दोन शेतकऱ्याची शेतजमिन शिवारात बंधारा बांधकाम करित असताना फक्त अंबुले यांची शेतीच यात गिळंकृत करण्यात आली आहे. कंत्राटदाराने मुजोरपणा करित शेती नेस्तनाबूत केल्याने या कुटुंबियाने आत्महत्या करावी काय, असा आरोप केला आहे. अल्पभूधारक शेतकरी असताना भूमिहीन होण्याची पाळी या शेतकऱ्यांवर कंत्राटदाराने आणली आहे. येत्या १५ दिवसात न्याय मिळाले नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आहे.

या शेतकऱ्यांची शेती बंधारा बांधकाम गिळंकृत करण्यात आली आहे. न्याय मागताना कंत्राटदाराची मुजोरी असल्याने अन्याय खपवून घेतले जाणार नाही. यात चौकशी करिता पाठपुरावा करणार आहे.-सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान आघाडी तुमसर.शेती गिळंकृत झाल्याने कुटुंबियावर उपासमारीची पाळी येणार आहे. न्याय मागताना कंत्राटदाराने मुजोरी केली असून न्यायासाठी सामूहिक आत्मदहन करणार आहे.-रामदयाल अंबुले, अन्यायग्रस्त शेतकरी देवरी देव.