सरपंचावर महिला सदस्यांचा हल्लाबोल
By Admin | Updated: August 2, 2014 23:55 IST2014-08-02T23:55:52+5:302014-08-02T23:55:52+5:30
देव्हाडी ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत महिला सरपंच व तीन महिला ग्रामपंचायत सदस्यात विषयाला धरुन प्रथम शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर पाण्याचा ग्लास महिला सरपंचाच्या अंगावर भिरकाविला.

सरपंचावर महिला सदस्यांचा हल्लाबोल
देव्हाडी येथील प्रकार : पोलिसात तक्रार दाखल
तुमसर : देव्हाडी ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत महिला सरपंच व तीन महिला ग्रामपंचायत सदस्यात विषयाला धरुन प्रथम शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर पाण्याचा ग्लास महिला सरपंचाच्या अंगावर भिरकाविला. सरपंचाच्या टेबलवरील लाकडी ठोकळा डोक्यावर मारताना तो सुदैवाने हुकला अन्यथा अनर्थ घडला असता. याप्रकरणी सरपंच सुनीता बिरणवारे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
३० जुलै रोजी देव्हाडी ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायतमध्ये आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता राजकुमार बिरणवारे होत्या. सभेत ग्रामपंचायत सदस्य गीता धर्मेंद्र बन्सोड, रंजना नागपूरे, रिता चैनलाल मसरके यांनी प्रश्न मांडला. विषयाला धरुन प्रश्न उपस्थित करा. बाहेरचे मुद्दे येथे उपस्थित करु नका असे सरपंच बिरणवारे यांनी तिनही महिला ग्रामपंचायत सदस्यांना सांगितले. यावरुन सभेत वाद व गोंधळ सुरू झाले. प्रथम शाब्दीक चकमक व नंतर टेबलवरील पाण्याने भरलेला ग्लास सरपंच बिरणवारे यांचे दिशेने भिरकावला. त्यानंतर टेबलवरील नावाचे लाकडी ठोकळा सरपंच यांच्या डोक्यावर मारताना सुदैवाने तो हुकला. यासोबतच शिवीगाळ केले. यासंदर्भात सरपंच बिरणवारे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तीन महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणी तीनही ग्रामपंचायत सदस्यांचे बयान नोंदविले. या प्रकरणाची आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे सरपंच बिरणवारे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)