विरोधकांवर हल्लाबोल करा, पण असांसदीय शब्द टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:06 IST2019-04-02T22:06:30+5:302019-04-02T22:06:50+5:30
प्रचारात विरोधी पक्षावर हल्लाबोल करा पण असांसदीय शब्दांचा वापर टाळा, अशा स्पष्ट सूचना नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. भाषण आणखी प्रभावी करण्यासाठी त्यात आकडेवारी सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे.

विरोधकांवर हल्लाबोल करा, पण असांसदीय शब्द टाळा
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : प्रचारात विरोधी पक्षावर हल्लाबोल करा पण असांसदीय शब्दांचा वापर टाळा, अशा स्पष्ट सूचना नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. भाषण आणखी प्रभावी करण्यासाठी त्यात आकडेवारी सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे.
विदर्भातील दहा लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. राजकीय पक्षांनी जिल्हास्तरावर वॉररुम तयार केल्या आहे. या वॉररुमचे संचालन थेट मुंबई- दिल्लीतून होत आहे. अंगाची काहली करणाऱ्या उन्हात नेते कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहेत. विरोधी पक्षावर हल्लाबोल करण्याचे निर्देश नित्य कार्यकर्त्यांना प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र हल्लाबोल करतांना एकेरी आणि असंसदिय शब्दाचा वापर टाळावा असे स्पष्टपणे बजावले आहे. भाषणात आकडेवारी मांडून भाषण प्रभावीपणे करण्यावर भर देण्यात आला आहे.
सोशल मीडिया संयमाने वापरा
लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परंतु पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयमाने यावर पोस्ट टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुणाचीही मानहानी होणार नाही, कुणी दुखावणार नाही याचे भान ठेवण्याचे ही यात बजावण्यात येते. सायबर क्राईमनुसार गुन्हेही दाखल होऊ शकतात.