वनमजुरांचा वेतनासाठी वनकार्यालयावर हल्लाबोल

By Admin | Updated: October 23, 2016 01:05 IST2016-10-23T01:05:56+5:302016-10-23T01:05:56+5:30

वन विभाग नाकाडोंगरी अंतर्गत मे, जून महिन्यात खड्डे खोदणे, रोपवन लागवड, झाडाची सफाईचे कामे करण्यात आले.

Attack on forest guilds for the wages of the weavers | वनमजुरांचा वेतनासाठी वनकार्यालयावर हल्लाबोल

वनमजुरांचा वेतनासाठी वनकार्यालयावर हल्लाबोल

दिवाळी अंधारात : नाकाडोंगरी वन विभागातील प्रकार
तुमसर : वन विभाग नाकाडोंगरी अंतर्गत मे, जून महिन्यात खड्डे खोदणे, रोपवन लागवड, झाडाची सफाईचे कामे करण्यात आले. मात्र दिवाळी हा सण तोंडावर असताना अद्याप मजुरी मिळाली नाही. परिणामी मजुरांनी वनविभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. परंतू वनपरिक्षेत्र अधिकारी सुटीवर गेल्यामुळे मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
वनविभागाची मॉसिव अर्पाटेशन योजना ही नाकाडोंगरी वनविभागात मे, जून महिन्यात राबविण्यात आली. त्यानुसार नाकाडोंगरी वन परिक्षेत्रामधील लोभी, आष्टी नाकाडोंगरी, राजापुर येथील आठशे मजूर कामावर होते.
खड्डे खोदणे, रोप लागवड व विडिंग (झाडाच्या सफाई) करिता शासकीय दरानुसार मजुरी मिळणार होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वनमजुरी केली. परंतु, नाकाडोंगरी वनविभागाच्या ढिसाळ कार्यामुळे मजुरांची मजुरी उशिरा मिळाली. मात्र तिथेही मजुरांच्या मजुरी थोडी कमी पैसे प्राप्त झाली. त्यामुळे कुणा मजुरीचे दिवस कापल्या गेले तर कुण्या मजुरांना मजुरीच्या दिवसापैकी कमी दिवसाची मजुरी देण्यात आली. त्यामुळे सलग तीन दिवसापासून मजुर आपले कामेधंदे सोडून कार्यालयाचे येरझारा घालत आहेत. त्यावर तेथील वनक्षेत्राधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असल्यामुळे नाकाडोंगरी वनविभाग कार्यालयावर वनमजुरांनी हल्लाबोल केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Attack on forest guilds for the wages of the weavers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.