शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रशिक्षण शिबिर

By admin | Updated: February 14, 2017 00:24 IST

नॅशनल एट्रोसिटीज प्रिवेन्शन फोर्सच्या वतीने १२ फेब्रुवारीला अखिल सभागृह गणेशपूर भंडारा येथे एक दिवसीय अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट प्रशिक्षण शिबिर पार पडले.

भंडारा : नॅशनल एट्रोसिटीज प्रिवेन्शन फोर्सच्या वतीने १२ फेब्रुवारीला अखिल सभागृह गणेशपूर भंडारा येथे एक दिवसीय अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट प्रशिक्षण शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन कुंदा तोडकर यांचे हस्ते व अविनाश शेंडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मंचावर डॉ. समीर पाटील, विलास खोब्रागडे, डॉ.समीर कदम, स्वप्नील वासनिक आदी उपस्थित होते.भारतीय संविधानाने या देशातील हजारो वर्षापासून चालत आलेले सर्व प्रकारचे भेद संपवले आणि या देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रदान करून सर्वांना विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र देवून दर्जा व संधीची समानता देण्याचे अभिवचन दिले. संविधानाने दिलेल्या वचनानुसार सर्वांना प्रतिष्ठीत जीवन जगता यावे याकरीता मुलभूत मानवाधिकार देण्यात आले.भारत देशातील सर्व नागरिकांना समान हक्क प्राप्त करून देणे व द ेशात कल्याणकारी राज्य स्थापन करणे हे स्वतंत्र भारताचे एकमेव उद्दिष्ट ठरविण्यात आले. हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यात आले असे संविधानात जाहीर केले. त्याबाबतची संविधानातील अनुच्छेद ९७ मधील तरतुद पुढील प्रमाणे आहे. अस्पृशयता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचारण निषिध्द करण्यात आले आहे. अस्मृश्यतेतुन उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे.अस्पृश्यता नष्ट करून, सामाजिक सखोल निर्माण करणे व राष्ट्रीय बंधुता प्रवर्धित करणे या भारतीय संविधानाचा प्रमुख उद्देश आहे. भारतातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकातील लोकांना प्रतिष्ठीत जीवन जगता यावे या संबंधी भत्तरतीय संविधानात अनेक तरतुदी आहे. त्यानुसार भारत सरकार आणि राज्य सरकारनी अनेक योजना केलेल्या आहेत. परंतु त्याची प्रभाविपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४६ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन विशेष काळजीपुर्वक करणे आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषणापासून त्यांचे रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीवर होणाऱ्या सामाजिक अत्याचारास प्रतिबंध करून त्यांना न्याय मिळण्यासाठी भारत सरकारने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम १९८१ पारित केला व सन १९९५ ला या कायद्याखाली नियम तयार केले. राष्ट्रीय अपराध आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सन २०११ यावर्षी देशात अनुसूचित जातीवर ३३ हजार ७१९ अत्याचार झाले आणि अनुसुचित जमातीवर ५ हजार ७५६ अत्याचार झाले. अत्याचाराची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती घटकातील लोकांना लोकांमध्ये कायद्याचे अज्ञान असल्यामुळे त्यांना न्याय आणि योजनेचा लाभ देण्यात अनेक अडचणी येतात.त्यासाठी कायद्याचे योग्य ज्ञान व अन्याय, अत्याचार निवारण्यासाठी एका संघटीत शक्तीचे निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय अन्याय, अत्याचार दलाच्या वतीने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक स्वप्नील वासनिक, संचालन नरेश आचला तर आभार शितल पिल्लेवान यांनी केले. कार्यक्रमासाठी तुळशीदास सार्वे, बागडे, मडावी, सुधीर पिल्लेवान, गजानन दळवी यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)