स्थानांतरणावरून वातावरण तापले

By Admin | Updated: February 11, 2016 00:55 IST2016-02-11T00:55:18+5:302016-02-11T00:55:18+5:30

जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगाव येथील एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीच्या पालकाबाबत अभद्र भाषेचा वापर केला.

The atmosphere fired from the transfer | स्थानांतरणावरून वातावरण तापले

स्थानांतरणावरून वातावरण तापले

डोंगरगाव येथील प्रकार : शिक्षकावर अर्वाच्च शब्दाचा वापर केल्याचा आरोप
मोहाडी : जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगाव येथील एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीच्या पालकाबाबत अभद्र भाषेचा वापर केला. याप्रकरणी त्या शिक्षकाचे स्थानांतरण करून कारवाई करण्यात आली. मात्र गावातीलच काही व्यक्तींनी त्या शिक्षकाची बाजू घेवून स्थानांतरण रद्द करण्याची मागणीसाठी पंचायत समिती मोहाडी येथे राडा केला. या प्रकरणामुळे डोंगरगाव येथे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. सध्या वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
डोंगरगाव येथील इयत्ता १० वी इंग्रजी विषयाचे शिक्षक एम.व्ही. बालपांडे यांच्यावर अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने लावला होता. त्यामुळे त्यांची या शाळेतून बदली करण्यात आली. मात्र ऐन परिक्षेच्या तोंडावर शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यांच्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे काही पालकांनी त्याच शिक्षकाची मागणी रेटून धरली आहे. काही पालकांच्या मते बालपांडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. राजकीय द्वेषातून त्यांच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. यासाठी पंचायत समिती मोहाडी येथे निवेदन देण्यात आले. बालपांडे यांनाच पुन्हा डोंगरगाव शाळेत पाठविण्यात यावे, अशी मागणी सरपंच शकुंतला सेलोकर, उपसरपंच जगदीश पंचभाई, सदस्य दिनेश सेलोकर, देवानंद साऊसाखरे, माधुरी समरीत, विजय बारई, शामकला सेलोकर, रंजना मांढरे आदी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आता कोणते पाऊल उचलते, याकडे डोंगरगाववासीयांचे लक्ष लागलेले आहे. (शहर प्रतिनिधी)

संबंधित प्रकरणाची शिक्षण विभाग पं.स. मोहाडीद्वारे चौकशी केली असता शिक्षक एम.व्ही. बालपांडे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले तसा अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आला. त्यांच्या आदेशान्वयेच सदर शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.
-रमेश गाढवे, गटशिक्षणाधिकारी पं.स. मोहाडी.

Web Title: The atmosphere fired from the transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.