साकोली येथे खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:31+5:302021-08-24T04:39:31+5:30
साकोली : स्थानिक वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली तथा राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी व वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांच्या ...

साकोली येथे खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम
साकोली : स्थानिक वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली तथा राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी व वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने खेळाडूंसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. जितेंद्र ठाकूर, प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा संघटक शाहिंद कुरेशी, डॉ. सुनील चतुर्वेदी, प्राचार्य घनश्याम निखाडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अनिल गायकवाड, डॉ. राजकुमार भगत, डॉ. पल्लवी देशमुख, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. रमेश अग्रवाल, प्रा. दिलीप चौधरी, प्रा. क्रिष्णा थेर, अरुण उपरीकर, विनोद गणवीर, गिरधर हटवार, मिथुन कुमार, अशोक कुमार, पुकराज लांजेवार, शाहीद सैयद, महेश करंजेकर, विजय शिवणकर, डाकराम नंदेश्वर, विवेक कुमार, दीपक लबाडे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. देवेंद्र इसापुरे यांनी मानले.