अबब! भंडारा जिल्ह्यातील पवनारा येथे एका घरात आढळले तब्बल १२ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 21:17 IST2022-07-16T21:16:00+5:302022-07-16T21:17:19+5:30
Bhandara News एक-दोन नव्हे तब्बल १२ साप एका घरात आढळल्याची घटना तुमसर तालुक्यातील पवनारा येथे शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

अबब! भंडारा जिल्ह्यातील पवनारा येथे एका घरात आढळले तब्बल १२ साप
भंडारा : एक-दोन नव्हे तब्बल १२ साप एका घरात आढळल्याची घटना तुमसर तालुक्यातील पवनारा येथे शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात साप निघाल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी गर्दी केली. अखेर वनविभागाच्या मदतीने सर्व सापांना पकडून निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले.
पवनारा येथे विशाल रामेश्वर कावळे यांचे घर आहे. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्वयंपाकघरात एकापाठोपाठ एक तीन नाग जातीचे दीड फूट लांबीचे सापाचे पिल्लं आढळली. त्यामुळे घरात एकच खळबळ उडाली. तत्काळ तुमसर येथील सर्पमित्र विकास तिडके व दुर्गेश मालाधरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी या घरात शोध घेतला असता तब्बल ११ पिल्लं आणि पाच फुट लांबीचा मादी साप आढळला. अत्यंत विषारी साप असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली. घरातील सर्वांना बाहेर काढून सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने बाराही सापांना जेरबंद केले आणि एका बरणीत भरून निसर्ग अधिवासात मुक्त केले.