चिंधीने ग्रिलला बांधलेल्या ‘नकोशी’च्या पित्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:30+5:30

दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक करण्यात अखेर शिरजगाव पोलिसांना बुधवारी यश आले. मुन्ना उर्फ स्वप्निल अजाबराव खरपे (३२, रा. अडुळा बाजार, दर्यापूर) असे त्याचे नाव आहे.

Arrest of 'Nakoshi' father tied to grill by razor | चिंधीने ग्रिलला बांधलेल्या ‘नकोशी’च्या पित्याला अटक

चिंधीने ग्रिलला बांधलेल्या ‘नकोशी’च्या पित्याला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देजावयाची करामत : शिरजगाव पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
करजगाव : नजीकच्या बोदड येथे एका घराच्या ग्रीलशी चिमुकलीला चिंधीने बांधून पलायन करणाऱ्या पित्याला व त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात शिरजगाव पोलिसांना अखेर यश आले. आरोपी हा सदर घरमालकाचा जावई असल्याची माहिती पुढे आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक करण्यात अखेर शिरजगाव पोलिसांना बुधवारी यश आले. मुन्ना उर्फ स्वप्निल अजाबराव खरपे (३२, रा. अडुळा बाजार, दर्यापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह मुलीच्या जन्मदात्रीलाही अटक करण्यात आली आहे.
रमेश सोलव यांच्या शेजारी राहणारे सुभाष वानखडे यांना प्रथम ही चिमुकली निदर्शनास आली. यानंतर शिरजगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीे. पोलिसांनी चिमुकलीला बेबी केअर सेंटर (अमरावती) ला रवानगी केली. घटनेचा छडा लावण्याकरिता कसून तपास सुरू केला. शिरजगाव पोलीस अखेर आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र, या घटनेतील गुंता अधिकच वाढला आहे. रमेश सोलव यांचा जावई मुन्नाचे पटत नसल्याने मुलगी शुभांगी ही बोदड (सुभानपूर) येथे माहेरी राहत असल्याची बाब उघड झाली. मुन्ना हा खुनशी व भांडखोर प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रथम पोलिसांच्या खबऱ्यांनी त्याचा माग काढला. मात्र, तो अमरावती जिल्ह्यातून तडीपार असल्याने हाती लागत नव्हता. अखेर पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे यांनी कसोशीने शोध घेतला व अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून गोपनीय माहितीच्या आधारे दोघांना अटक केली. पोलीस चौकशीत सदर त्याने गुन्हा कबूल केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक कांबळे व पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, नायक पोलीस कॉँस्टेबल सुनीता जांभेकर, काँस्टेबल प्रतापसिंह ओलीक्षेत्री यांनी गुन्हा उघडकीस आणला.

Web Title: Arrest of 'Nakoshi' father tied to grill by razor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.