पसार आरोपीला अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:48+5:30

पीडित मुलीचे पितृछत्र हरविले असून अत्यल्प भूधारक असल्यामुळे भाऊ किराणा दुकानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. आरोपी श्रीमंत कुटुंबातील असून पैशाच्या बळावर मतिमंद मुलीस जून २०१९ पासून जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. इंद्रपाल टेकाम (३२) व तनुज नाहोकर रा. बेला अशी आरोपींची नावे आहेत.

Arrest the accused | पसार आरोपीला अटक करा

पसार आरोपीला अटक करा

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांना निवेदन : अन्याय निवारण समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाणे हद्दीतील कन्हाळगाव या गावातील एका मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक करून मुकबधीर मुलीस न्याय मिळवून द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना जनकल्याण समाजोन्नती अन्याय निवारण समितीचे तालुकाध्यक्ष दिनेश वासनिक यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
सदर पीडित मुलीचे पितृछत्र हरविले असून अत्यल्प भूधारक असल्यामुळे भाऊ किराणा दुकानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. आरोपी श्रीमंत कुटुंबातील असून पैशाच्या बळावर मतिमंद मुलीस जून २०१९ पासून जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला. इंद्रपाल टेकाम (३२) व तनुज नाहोकर रा. बेला अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी तनुज नाहोकर हा ठाणेदार अंबादास सुनगार यांच्या आशिर्वादाने पसार आहे.
सदर आरोपींस अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना दिनेश वासनिक, नितेश डोंगरे, हेमंत लाडे, धनू लोहबरे, जितू हुमने, नरेश बेलेकर, धनपाल गडपायले, संदिप मारबते, अमित वैद्य, अचल मेश्राम यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Arrest the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस