जिल्ह्यात भूमिगत विद्युतीकरणासाठी कटिबद्ध

By Admin | Updated: October 29, 2015 00:44 IST2015-10-29T00:44:32+5:302015-10-29T00:44:32+5:30

नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा.

Arranged for underground electrification in the district | जिल्ह्यात भूमिगत विद्युतीकरणासाठी कटिबद्ध

जिल्ह्यात भूमिगत विद्युतीकरणासाठी कटिबद्ध

चंद्रशेखर बावनकुळे : नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ सभा
लाखनी/मोहाडी/लाखांदूर: नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा. राज्याचा उर्जामंत्री म्हणून येथील संपूर्ण विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्यास सहकार्य करेल व लाखनी नगराच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन भाजपा कार्यकर्ता बैठकीत उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सभेला खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, शिवराम गिऱ्हेपुंजे, घनश्याम खेडीकर उपस्थित होते. लाखनी, मोहाडी व लाखांदूर नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी ना. बावनकुळे म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात पैसे भरूनही विहिरीवर पंपासाठी दोन लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले नाही. भाजप सेनेचे सरकार सत्तेवर येताच उर्जामंत्री म्हणून मागेल त्या शेतकऱ्याला विहिरीवरील पंपासाठी वीज कनेक्शन दिले जाईल. लाखनी नगरपंचायत झाल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या ४० ते ४५ योजनांचा फायदा घेता येईल. विकासाचा आराखडा तयार करा व मंत्रालयात पाठवा. राज्यात शासन भाजपचे असल्याने विकासात हातभार लावले जाईल. रस्ते, गटरलाईन, स्ट्रिट लाईन, क्रीडांगण, बगीचे, स्मशानभूमीचे कामे हाती घेता येतील. येथील आमदार, खासदार यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मालगुजारी तलावाच्या खोलीकरणासाठी १०० कोटी रुपयाचा निधी दिला.
यावेळी खासदार नाना पटोले यांनी, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा. प्रधानमंत्री मुद्रा योजना होतकरू तरुणास स्वयंरोजगारासाठी रोजगारास ५० हजार रुपयापासून १० लाख रुपयापर्यंत कर्ज टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. सर्व प्रकारचे लोकांना दाखले मिळावे यासाठी राज्य सरकारने गावागावात समाधान शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासन जनतेच्या दारी अशी योजना राबविली जात असल्याचे आमदार बाळा काशीवार यांनी सांगितले. यावेळी शिवराम गिऱ्हेपुंजे, डॉ.प्रकाश मालगावे, पद्माकर बावनकर, बबलू निंबेकर, दिलवर रामटेके, म.बा. बोळणे, घनश्याम खेडीकर, पुष्पा गिऱ्हेपुंजे, शरद निर्वाण आदी उपस्थित होते. संचालन वाल्मिक लांजेवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arranged for underground electrification in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.