सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:57 IST2017-09-17T22:56:35+5:302017-09-17T22:57:00+5:30

तालुक्यातील मुरमाडी/ सावरी येथील समर्थ नगरातील प्रमोद डोरले यांच्या घरी किरायाने राहणाºया घनश्याम ईश्वर शेंडे (२८) रा. पिंपळगाव (खांबी) ता. अर्जुनी मोर जि. गोंदिया याला सुगंधित,....

Aromatic tobacco stocks seized | सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

ठळक मुद्दे१ लक्ष १६ हजार माल जप्त : लाखनी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी/ सावरी येथील समर्थ नगरातील प्रमोद डोरले यांच्या घरी किरायाने राहणाºया घनश्याम ईश्वर शेंडे (२८) रा. पिंपळगाव (खांबी) ता. अर्जुनी मोर जि. गोंदिया याला सुगंधित, स्वादिष्ट तंबाखुा व तंबाखुजन्य पदार्थ बाळगण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरुन धाड घतली असता तंबाखु, पन्नी आदी १ लक्ष १६ हजार रुपयाचे माल पकडला गेला. परिपत्रकानुसार गुटखा, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू सुंगधित स्वादिष्ट सुपारी खर्रा हे पदार्थ अन्य कोणत्याही नावाने संबोधले जात असतील ते सर्व पदार्थांच्या उत्पादन साठा वितरण व विक्रीवर प्रतिबंध घातलेले असल्यावरुन सुगंधित तंबाखु व इतर साहित्य जप्त करण्यात आले. भादवि कलम १८८, २७२, २७३ सहकलम ४१(१) सीआरपीसी अनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Aromatic tobacco stocks seized