लाखनी ‘भूमिअभिलेख’चा मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:58+5:30

सदर कार्यालयाला भेट दिली असता उपअधीक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल काहीही सांगण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उपअधीक्षकांकडे लाखांदूरचा कारभार असल्याची माहिती आहे. परंतु ते कार्यालयात केव्हा उपस्थित राहतात. याबाबत कोणताही कर्मचारी निश्चितपणे सांगू शकत नव्हता. मोबाईलवर संपर्क केला असता ते नॉटरिचेबल आढळून आले.

The arbitrary stewardship of the lakhs' land records | लाखनी ‘भूमिअभिलेख’चा मनमानी कारभार

लाखनी ‘भूमिअभिलेख’चा मनमानी कारभार

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची कामे रखडली : साहेब असतात कायम नॉट रिचेबल

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुका निर्मितीनंतर नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय कार्यालयांसोबतच भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयही सुरु करण्यात आले. परंतु गत दोन वर्षांपासून या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे.
सदर कार्यालयाला भेट दिली असता उपअधीक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल काहीही सांगण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उपअधीक्षकांकडे लाखांदूरचा कारभार असल्याची माहिती आहे. परंतु ते कार्यालयात केव्हा उपस्थित राहतात. याबाबत कोणताही कर्मचारी निश्चितपणे सांगू शकत नव्हता. मोबाईलवर संपर्क केला असता ते नॉटरिचेबल आढळून आले.
लाखनी नगर पंचायतीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जासोबत आखिव पत्रिका जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे फेरफार नोंदी, वारसा नोंदीकरिता शेकडो नागरिक भूमिअभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. त्याचप्रमाणे फेरफार नोंदी, वारसा नोंदी, खरेदीखत नोंदी, संबंधित कामे चार ते पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे दिसून आले. आखिव पत्रीकासाठी दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागत असून अधिक शुल्क वसूल केले जात असल्याची तक्रार आहे. एखाद्याने यावर आक्षेप घेतला तर त्याचे काम प्रलंबित ठेवले जाते. कार्यालयातील उपअधीक्षक आठवड्यातून एखादा दिवशी उपस्थित राहत असल्याचे सांगण्यात आले. तेथील कर्मचारी मात्र साहेब मोजणीवर आहेत. कोर्टात आहेत. मिटींगमध्ये आहेत, असे उडवाउडवीची उत्तरे देतात. भूमिअभिलेख कार्यालयात येणाºया नागरिकांशी कर्मचारी उर्मटपणे वागतात, अशा आरोप नगरसेवक धनु व्यास यांनी केला. कामाचा निपटारा तात्काळ झाला नाही तर आंदोलनाचा इशारा त्यानी दिला.

भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाºयांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत. एका अधिकाºयाला चार दिवस भंडारा येथे कार्यालयात जावे लागते. यामुळे लोकांचा कामांना विलंब होतो.
- भी. मो. नान्ने
उपअधीक्षक, भूमिअभिलेख लाखनी

Web Title: The arbitrary stewardship of the lakhs' land records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.