जिल्हा इंटकचा एप्रिल कुल कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:05+5:302021-04-02T04:37:05+5:30
एक एप्रिल या दिवशी देशातील जनता मोठ्या प्रमाणात विनोदाचा प्रकार म्हणून आजच्या दिवशी एकमेकांशी खोटे बोलून किंवा सांगून विनोदाचा ...

जिल्हा इंटकचा एप्रिल कुल कार्यक्रम
एक एप्रिल या दिवशी देशातील जनता मोठ्या प्रमाणात विनोदाचा प्रकार म्हणून आजच्या दिवशी एकमेकांशी खोटे बोलून किंवा सांगून विनोदाचा प्रकार म्हणून मजा घेत असतात. परंतु, भारताच्या इतिहासात एक एप्रिल या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे महत्त्व सर्वसाधारण जनतेला कळलेच नाही. आजच्या दिवसाचे जनतेस महत्त्व कळावे म्हणून राष्ट्रीय मजूर संघ जिल्हा भंडाराच्या वतिने एप्रिल कुल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे १ एप्रिल १९३५ रोजी दि प्राब्लेम ऑफ रुपीझ हा ग्रंथ देशाला बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केला व याच आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे आजपासून दैनंदिन तापमानात बदल घडून येतो. उष्णतेपासून उकाडा होतो. त्यामुळे वातावरणात थंडी यावी, याकरिता प्रत्येकाने एक झाड लाऊन निसर्गाचे ऋण फेडावे व मानवी जीवनास सहकार्य करावे, असे या एप्रिल कुल या कार्यक्रमाचे महत्त्व आहे.
या कार्यक्रमास प्रामुख्याने राष्ट्रीय मजूर संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, महासचिव महेंद्र वाहाणे, स्मारक समितीचे सचिव एम. आर. राऊत, उपाध्यक्ष जीवन भजनकर, भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत देशकर, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सोहेल अहमद, भंडारा शहर इंटकच्या महिला अध्यक्षा स्नेहा भोवते, मिलिंद जोशी, विनायक दिवटे, लेकराम देवगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.