खुटसावरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST2021-06-10T04:23:52+5:302021-06-10T04:23:52+5:30

मौजा खुटसावरी येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ च्या इमारत बांधकामाकरीता मुकरर केलेली जागा मा. आयुक्त पशुसंवर्धन यांचे नावे ...

Approve the veterinary dispensary building at Khutsavari | खुटसावरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत मंजूर करा

खुटसावरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत मंजूर करा

मौजा खुटसावरी येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ च्या इमारत बांधकामाकरीता मुकरर केलेली जागा मा. आयुक्त पशुसंवर्धन यांचे नावे करणेबाबत यापूर्वी ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पशुधन विकास अधिकारी खुटसावरी यांनी पत्रव्यवहार केला होता. परंतु आजपर्यंत सदर बाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

इमारत बांधकामाकरीता सर्व्हे क्र. ७९ ची आराजी ०.१७ हेक्टर आर जागा मुकरर केलेली असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारा व संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्यात आलेला होता. मात्र अद्यापही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर पशुवैद्यकीय दवाखान्याचा लाभ परीसरातील माडगी, टेकेपार, पिंपळगाव आदी गावांना होतो. सध्या सदर दवाखाना भाड्याच्या घरात आहे. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करुन गोपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच मनिषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Approve the veterinary dispensary building at Khutsavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.