जिथे लसीकरण, तेथीलच शिक्षकांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:57+5:302021-09-17T04:41:57+5:30
महा.राज्य प्राथ.शि. तालुका संघाची मागणी मोहाडी : लसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात येणारे दोन शिक्षक त्याच गावातील नियुक्त करावेत, अशी ...

जिथे लसीकरण, तेथीलच शिक्षकांची नियुक्ती करा
महा.राज्य प्राथ.शि. तालुका संघाची मागणी
मोहाडी : लसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात येणारे दोन शिक्षक त्याच गावातील नियुक्त करावेत, अशी मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघ, मोहाडी तालुकातर्फे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत कोविड - १९ करिता राष्ट्रीय स्तरावर लसीकरण अभियान संपूर्ण देशात सुरु आहे. या अभियानात मोहाडी तालुक्यातील संपूर्ण शिक्षकांचे सक्रिय सहकार्य आहे. परंतु लसीकरणाकरिता तालुक्यातील प्राथ. आ. केंद्रात ज्या दोन शिक्षकांची नियुक्ती केले जाते, ते दोन शिक्षक दुसऱ्याच गावातील असतात. जिथे लसीकरण असते, त्या गावात जात असतात. त्यांना मोबाईल नेटवर्कच्या अडचणी आल्यावर ओळखीचे कुणी नसल्याने मोठा त्रास होतो. त्यामुळे केंद्रनिहाय आदेश न काढता ज्या गावचे लसीकरण आहे, त्याच गावातील शिक्षकांचे आदेश केले असता अधिक सोयीचे होईल. त्या गावातील शिक्षक असल्यामुळे मोबाईल नेटवर्कची अडचण राहणार नाही. गावकऱ्यांशी ओळख असल्यामुळे अभियानाला गती यईल. याकरिता ज्या गावचे लसीकरण "त्याच गावचे शिक्षक धरा, तरच होईल लसीकरण बरा" या आशयाचे निवेदन मंगळवारी गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी, मोहाडी यांना महा. राज्य प्राथ. शि. संघ, मोहाडीच्या वतीने देण्यात आले.