शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:26+5:30

संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे. जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.

Appeal from farmers to submit loss information to insurance company | शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला सादर करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला सादर करण्याचे आवाहन

ठळक मुद्देकृषी विभागाची सूचना : ४८ तासांच्या आत माहिती देणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात माहिती संबंधित विमा कंपनीला सादर करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे.
जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.
शेतकºयांनी पीक नुकसान सूचना फॉर्म सोबत पीक विमा भरलेल्या पावतीची झेरॉक्स आणि शेतीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रावर सदर अर्ज उपलब्ध आहे. दोन दिवसाच्या आत विमा कंपनीचा प्रतिनिधी किंवा सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, कृषी सहाय्य, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी येथेही हा अर्ज सादर करता येणार आहे.
शेतकºयांच्या नुकसानीचे कृषी विभाग सर्वेक्षण करणार आहे. परंतु त्याआधी शेतकºयांनी स्वत: विमा कंपनीकडे सातबारा, नुकसानग्रस्त पिकाचे फोटो, आधारकार्ड, बँकेचा खातेक्रमांक यासह उपरोक्त दिलेल्या ई-मेलवर अथवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीलाल माहिती दिल्यास त्यांना पीक विमा मिळणे सोपे जाईल. यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सलग सुटीमुळे कृषी व महसूल विभागाचे सर्वेक्षण अद्यापही सुरु झाले नाही.
त्यामुळे ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनीपर्यंत पोहचविण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच आता आपल्या शेतातील नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, कृषी विभागाच्या मदतीने सर्वेक्षण लवकरच सुरु होणारआहे.
-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

Web Title: Appeal from farmers to submit loss information to insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी