साकोली नगरपरिषदेची उद्घोषणा जाहीर

By Admin | Updated: September 6, 2015 00:28 IST2015-09-06T00:28:24+5:302015-09-06T00:28:24+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडताच साकोलीत नगरपंचायतच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते.

Announcement of Sakoli Municipal Council | साकोली नगरपरिषदेची उद्घोषणा जाहीर

साकोली नगरपरिषदेची उद्घोषणा जाहीर

नगरपंचायतीची प्रक्रिया रद्द : आक्षेप घेण्यासाठी मिळणार ३० दिवसांचा कालावधी
साकोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडताच साकोलीत नगरपंचायतच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. राज्यपालानी जाहिर केलेल्या साकोली नगर परिषदेच्या उद्घोषणेने साकोली व सेंदूरवाफावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आमदार बाळा काशिवार यांनी साकोलीत नगर परिषदे व्हावी यासाठी पाठपुरावा केला. दोन महिन्यात या प्रक्रीयेला पुर्णत्वास नेले. राज्यपालांनी ३ रोजी साकोली नगरपरिषदेची उद्घोषणा केली. या नगरपरिषदे संबंधी आक्षेपासाठी ३० दिवसाचा कालावधी दिला आहे. आक्षेपासाठी उद्घोषणा प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी सादर करा. त्यानंतरच्या आक्षेपावर विचार करण्यात येणार नाही, असे उद्घोषणेत नमुद आहे. यापुर्वी १ मार्च २०१४ अन्वये केलेली उद्घोषणा रद्द करण्यात आली आहे. या उद्घोषणेनुसार साकोली नगर परिषदेची सिमांकन पुर्व सेंदुरवाफा या गावाची पुर्वेकडील महसूल हद, पश्चिम साकोली या गावाची महसुल हद, उत्तर साकोली व सेंदुरवाफा या गावाची उत्तरेकडील महसुल हद तर दक्षीण दिशा साकोली व सेंदुरवाफा गावाची पश्चिमेकडील महसुल हे हद अशी नमुद आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेत सेंदुरवाफा या गावाचा समावेश असुन अन्य गावाचा समावेश नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Announcement of Sakoli Municipal Council