पालांदूर येथे श्री संत रविदास यांचा जयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST2021-03-01T04:41:11+5:302021-03-01T04:41:11+5:30

पालांदूर : श्री संत रविदास महाराज यांचा जयंती उत्सव उत्साही वातावरणात चर्मकार मंडळाच्या वतीने रविदास महाराज मंदिर बाजार ...

Anniversary celebration of Shri Sant Ravidas at Palandur | पालांदूर येथे श्री संत रविदास यांचा जयंती उत्सव

पालांदूर येथे श्री संत रविदास यांचा जयंती उत्सव

पालांदूर : श्री संत रविदास महाराज यांचा जयंती उत्सव उत्साही वातावरणात चर्मकार मंडळाच्या वतीने रविदास महाराज मंदिर बाजार चौक, पालांदूर येथे पार पडला.

कोरोनाच्या सावटात प्रशासनाने पुरविलेल्या निर्देशांचे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीत जयंती उत्सव पार पाडण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, लोकमत वितरक व सामाजिक कार्यकर्ते केशव कुंभरे यांच्या हस्ते गोपालकाला अर्थात दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रमाकरिता समाज बांधवात जगजीवन चोहले, संजय कुंभरे, विश्वास कुंभरे, अमर चोहले, अनूबाई कुंभरे, हेमाबाई कुंभरे, सीमा कुंभरे, वंदना चौबे, शालू कुंभरे, गीता कुंभरे, राजेश चोहले, मनोहर चोहले, ईश्वर कुंभरे गुरुजी, विकास कुंभरे, चिंतामण कुंभरे, उदयभान चोहले, भरत तांडेकर, मुकेश कुंभरे, रोशन चौबे, पेरस चोहले, नंदा चोहले, नरेश कुंभरे, विजय कुंभरे, रामभाऊ कुंभरे, सुहागन कुंभरे, प्रियंका चौहले, बच्चे कंपनीत संकल्प, शौर्य, आराध्य, अध्यायननी, हनी आदी समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम गोड केला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Web Title: Anniversary celebration of Shri Sant Ravidas at Palandur