प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रीय

By Admin | Updated: March 11, 2016 00:56 IST2016-03-11T00:56:21+5:302016-03-11T00:56:21+5:30

उन्हाळ्याची चाहुल लागली असून पाणगळीमुळे जंगल विरळ झाले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकतांनी शिकार करणारी टोळी दबा धरुन बसून राहत आहे.

Animal Hunting Activists | प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रीय

प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रीय

वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात : खबरींची वाणवा, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
तुमसर : उन्हाळ्याची चाहुल लागली असून पाणगळीमुळे जंगल विरळ झाले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकतांनी शिकार करणारी टोळी दबा धरुन बसून राहत आहे. तुमसर तालुक्यातील तीन वनपरिक्षेत्रातून आठवड्यातून तीन दिवस चितळाची शिकार करुन मांसविक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे. वनविभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ दिसत आहे. वनविभागाची धूरा ज्या खबऱ्यांवर अवलंबून असते ते खबरी गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यात तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी असे तीन मोठे वनपरिक्षेत्र आहेत. या जंगलात वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. असी नोंद शासन दप्तरी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून पाण्याचा स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत आहे. या तिन्ही वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठे नाहीत. केवळ नैसर्गिक पाणवठे आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमा या जंगलांना लावून आहेत. बावनथडी प्रकल्प, परिसर, चांदपूर जलाशय बावनथडी नदी, वैनगंगा नदी व लहान मोठे तलाव या वन्यप्राण्यांची तहाण भागवतात.
तुमसर शहरात आठवड्यातून किमान तीन दिवस बुधवार, शुक्रवार व रविवारी वन्यप्राणी विशेषत: चितळ, हरिण, रानडुक्कर, मोर यांची शिकार करुन ते विकल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यांचे ग्राहक ठरले आहेत. विशेषत: उन्हाळ्यात शिकार जास्त होते असे समजते.
पावसाळ्यात व हिवाळ्यात शिकारींचे प्रमाण अत्यंत कमी असते. उन्हाळ्यातच शिकारी टोळ्या जंगलात सक्रिय होतात अशी माहिती आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्रात अधिकारी तथा इतर कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आहे. त्याशिवाय वनविभागात खबऱ्यांची संख्याही बरीच आहे, पंरतु हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सुरु असूनही वनविभागाने अजूनपर्यंत ठोस कारवाई केली नाही, हे विशेष. वन्यप्राण्यांची शिकार नेमकी कोणत्या वनपरिक्षेत्रात केली जात आहे हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी या वनपरिक्षेत्राच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. येथे वनविभागाचे नेटवर्क कमकुवत ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असुन या प्रकरणाचा सखोल तपास व चौकशी करण्यात येईल. वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. शिकार होत असतील तर त्याचा नक्कीच छडा लावण्यात येईल.
- एम. एन. माकडे,
वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी

वन्यप्राण्यांची शिकार होण्यामागे वनअधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहणे हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. वनकर्मचाऱ्यांच्या सदनिका शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे राहावे कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहे.
स्थानांतरणात घोळ
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे नियम आहे, तुमसर येथील वनपरिक्षेत्राधिकारी लेंडेझरी येथे व लेंडेझरीचे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे तुमसर येथे स्थानांतरण करण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षााच झाला होात. परंतु एकाच तालुक्यातील वनपरिक्षेत्रात असे स्थानांतरण करता येते काय? असा मुख्य प्रश्न आहे.

Web Title: Animal Hunting Activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.