शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस ठाण्यात आमदारांनी वाहिली शिव्यांची लाखाेली, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 13:00 IST

व्यापाऱ्याचे पैसे पोलिसांनी लुटले असल्याचा आरोप तुमसर तालुक्यातील एका व्यापाऱ्याने केला होता, याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका आमदाराने पोलिसांचा चक्क अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देमाेहाडीतील प्रकार तुमसरच्या व्यापाऱ्याचे पैसे पाेलिसांनी लुटल्याचा आराेप

भंडारा : पोलिसांनी मारहाण करून कारमधील ५० लाख रुपये लुटल्याचा आरोप तुमसर तालुक्यातील व्यापाऱ्याने केला असून, तशी तक्रार मोहाडी ठाण्यात शुक्रवारी रात्रीच दिली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार महाशयांनी चक्क पाेलिसांना अश्लील शिव्यांची लाखाेली वाहिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आमदार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

राजू कारेमाेरे असे आमदारांचे नाव आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अविनाश वसंत पटले (रा. हसारा, ता. तुमसर) आणि त्यांचा मित्र यासिन छव्वारे हे दोघे ३१ डिसेंबरच्या रात्री १० वाजेच्या सुमारास नागपूरवरून भंडारा मार्गे तुमसरकडे जात होते. माेहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाजवळ कारसमोर एका पोलिसाने अचानक दुचाकी वळविली. पोलिसाला इंडिकेटर का दाखविले नाही, असे विचारणा केली असता पाेलिसानेच शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी तेथे उपस्थित इतर पोलिसांना बोलावून मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये असलेले ५० लाख रुपयेही लुटले, अशी तक्रार मोहाडी ठाण्यात करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती होताच शुक्रवारी रात्रीच आमदार राजू कारेमोरे मोहाडी ठाण्यात पोहोचले. याठिकाणी त्यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र, कानउघाडणी करताना त्यांची जीभ घसरली. अतिशय खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पहाटे ४ वाजेपर्यंत तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू होती. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. दुसरीकडे पाेलिसानेही शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार केली. सध्या प्रकरण चौकशीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता प्रकरण कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज बघून सत्य काय ते चौकशीत समोर येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात येईल.

-राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक मोहाडी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMLAआमदारPoliceपोलिस