शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी इमारत बांधकामाची देयके रखडली

By admin | Updated: March 27, 2015 00:19 IST

भंडारा जिल्ह्यात २०१२-१३ या आर्थिक वर्षात अंगणवाडी इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यात ४४ इमारतींचा समावेश आहे.

रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)भंडारा जिल्ह्यात २०१२-१३ या आर्थिक वर्षात अंगणवाडी इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यात ४४ इमारतींचा समावेश आहे. इमारत बांधकाम झाले असताना कंत्राटदारांना देयके देण्यात आलेले नाही. जिल्हा वार्षिक नियोजनात तेराव्या वित्त आयोगातून २०१२-१३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ४४ अंगणवाडी इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. या इमारत बांधकामासाठी २ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. प्रत्येक इमारत बांधकामासाठी ४ लाख ५० हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. तरतूद निधीपैकी १ कोटी ९८ लाख रुपये इमारत बांधकामासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार इमारत बांधकामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी २०१४ पर्यंत कंत्राटदारांनी या बांधकामाचा करारनामा केला असून प्रत्यक्षात बांधकाम पूर्ण झाली आहेत. या इमारत बांधकामाचा १ कोटी ७१ लाख ६६ हजार रुपयाचा निधी अखर्चित आहे. परंतु या निधीतून कंत्राटदारांना देयके देण्याची मंजूरी मिळाली नाही. या विभागावर सार्वजनिक बांधकाम विभाग निधी वाटपासाठी पत्रव्यवहार करीत आहे. परंतु अखर्चित निधीने २०१४-१५ या वर्षात कंत्राटदारांना देयके देण्याची अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे भंडारा तालुक्यात ९, तुमसर तालुक्यात ७, साकोली तालुक्यात ११, पवनी तालुक्यात १५, लाखांदूर तालुक्यात १, मोहाडी तालुक्यात १ असे तालुका निहाय ४४ इमारत बांधकामाचे देयके रखडलेले आहे.यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाने चारवेळा एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. देशात इंटरनेटने जगाला जोडले जात असताना जिल्हा परिषदेत फाईल मात्र थांबून आहे. यामुळे मंज़ुरीपत्र पोहचताना विलंब लागत आहे. केंद्र आणि राज्यात एक पक्षाची सत्ता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही याच पक्षाचे आहेत. मुंबई तथा पुणे येथून मंजूरीचे पत्र आणताना अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. अंगणवाडी इमारत बांधकामाला अनेक महिने लोटली आहेत. परंतु कंत्राटदारांना देयके देण्यात आली नाही. कंत्राटदार आणि साहित्य पुरवठा धारक हमरीतुमरी आले आहेत. या देयकाकरिता कंत्राटदाराचे रोजची हजेरी जिल्हा परिषदेमध्ये सुरु झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने बाल कल्याण विभागात विचारले असता यासंदर्भात पत्रव्यवहार सुरु असल्याचे सांगून २०१४-१५ या वर्षात अखर्चित निधी वाटपाची मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले. यासंदर्भात महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती रेखा भुसारी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांंच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.