दुचाकीच्या धडकेत जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2023 16:20 IST2023-05-12T16:20:17+5:302023-05-12T16:20:24+5:30
लाखनी शिवारातील सर्व्हीस मार्गाने पायी जात असताना अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना धडक मारली होती.

दुचाकीच्या धडकेत जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू
भंडारा : भरधाव वेगाने असलेल्या अज्ञात दुचाकी चालकोन पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यातील गंभीर जखमीवर नागपूर येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालावली. करुणाकर पांडूरंग गजभिये (६३) रा. पंचशील वॉर्ड, साकोली, असे मृत वृध्दाचे नाव आहे.
लाखनी शिवारातील सर्व्हीस मार्गाने पायी जात असताना अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना धडक मारली होती. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेघराज गजभिये यांच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून दुचाकी चालविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन सुर्यवंशी करीत आहेत.