शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

शिक्षकांना ॲन्टिजेन चाचणीची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांची चाचणी कधी होणार आणि शाळा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचणीशिवाय शाळेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : प्रतिबंधित क्षेत्रासह लक्षणे असणाऱ्यांचीच आरटीपीसीआर

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास महत्वाचा अडसर ठरलेली आरटीपीसीआर चाचणी ऐवजी आता ॲन्टिजेन चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भंडारा शहर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कोविड अनुशंगाने लक्षणे असणाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सोमवारी याबाबत आदेश निर्गमित केल्यानंतर शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. मंगळवारी अनेक शिक्षकांनी आपली ॲन्टीजेन चाचणी करण्यासाठी कोरोना केअर सेंटरवर धाव घेतली. जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांची चाचणी कधी होणार आणि शाळा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआर चाचणीशिवाय शाळेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाच शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देशित केले होते. आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल येण्यास मोठा विलंब लागण्याची शक्यता होती. अशा स्थितीत मुलांना शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालाकांना तर शाळा व्यवस्थापन समितीमध्येही गोंधनाळी स्थिती निर्माण झाली होती.दरम्यान शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी ॲन्टीजेन चाचणी संदर्भात मागणी केली होती. यावरून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ॲन्टीजेण चाचणी करण्यास मुभा दिली. ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देशित केले. मात्र भंडारा शहर, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रातील आणि कोविडची लक्षणे आढळणाऱ्या  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मात्र आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

२०२ शाळा सुरू  जिल्ह्यात पहिल्या दिवशी शाळा सुरू करताना काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी मात्र स्थिती सामान्य होवून जिल्ह्यात २०२ शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यात ३४२ शाळा असून तेथे ६६ हजार ५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तर ३१४८ शिक्षक कार्यरत आहेत. आता ॲन्टीजेन चाचणी होणार असल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रशासनाने ॲन्टीजेन चाचणी करण्याची परवाणगी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक ॲन्टीजेन चाचणी करीत आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. -संजय डोर्लीकर,             शिक्षणाधिकारी, भंडारा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcollectorजिल्हाधिकारी