अखेर २५ वर्षांनंतर कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतरण
By Admin | Updated: June 25, 2014 00:14 IST2014-06-25T00:14:41+5:302014-06-25T00:14:41+5:30
मागील २५ वर्षापासून नगरपरिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांचे प्रथमच स्थानांतरण होत आहे. यामुळे एक तप एकाच ठिकाणी नोकरी केल्याने दुसरीकडे जाण्यास ते इच्छूक नाहीत.

अखेर २५ वर्षांनंतर कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतरण
तुमसर/भंडारा : मागील २५ वर्षापासून नगरपरिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांचे प्रथमच स्थानांतरण होत आहे. यामुळे एक तप एकाच ठिकाणी नोकरी केल्याने दुसरीकडे जाण्यास ते इच्छूक नाहीत. राजकीय वजन वापरून स्थानांतरण रद्द करण्याकरिता फिल्डींग लावली आहे. काही दीर्घ रजेवर गेले आहेत. स्थानांतरण रद्द होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. हे स्थानांतरण सामान्य प्रक्रियेअंतर्गत झाल्याची माहिती आहे.
क गटातील नगरपरिषद सोडून सर्वच नगरपरिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तथा भंडारा नगरपरिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतरणाचे आदेश निघाले आहेत. दि. २१ जून ला हे आदेश भंडारा येथे पोहचले. यात तुमसर नगरपरिषदेचे कनिष्ठ अभियंता अनिल देशमुख यांचे स्थानांतरण कामठी येथे झाले आहे. त्यांना तसे आदेश पाठविण्यात आले आहे. देशमुख यांच्या जागेवर भंडारा नगरपरिषदेचे देवदत्त नागदेवे यांना तुमसर येथे पाठविण्यात आले आहे. परंतु तुमसरात २५ वर्षापासून कार्यरत कनिष्ठ अभियंता देशमुख रिलीव्ह झाले नाहीत. तर ते दीर्घ रजेवर गेले आहेत. भंडारा येथील डवले यांचे स्थानांतरण गोंदिया येथे झाले आहे. येथे देशमुख आपले स्थानांतरण रद्द करण्याकरिता प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते रिलीव्ह झाले नाही. भंडारा येथील कनिष्ठ अभियंता नागदेवे यांना त्यांची स्थानांतरणाचा आदेश मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांना मुख्याधिकारी रिलीव्ह करीत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांनी रिलीव्ह केले तर तात्काळ पदभार नवीन नगरपरिषदेत स्वीकारण्यास तयार आहेत. नागदेवे यांच्या जागेवर राजुरा येथील कनिष्ठ अभियंता तामनकर येत असल्याची माहिती आहे. स्थानांतरणाचा आदेश झाल्यानंतरही अभियंते नवीन ठिकाणी रूजू झालेले नाहीत. (प्रतिनिधी)