अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:35+5:302021-03-23T04:37:35+5:30

भंडारा : अखिल भारतीय शिक्षक संघटनेशी संलग्नित असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हास्तरीय सभा रविवारी पार पडली. या ...

Admission to All Maharashtra Primary Teachers Association | अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश

भंडारा : अखिल भारतीय शिक्षक संघटनेशी संलग्नित असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हास्तरीय सभा रविवारी पार पडली. या सभेत वरिष्ठ शिक्षक महेश यावलकर यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय अखिल संघाच्या सभेत अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, जिल्हा परिषद सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, शिक्षक नेते श्रावण लांजेवार, शाखाध्यक्ष मूलचंद वाघाये, संचालक विलास टिचकुले, विकास गायधने, जे. एम. पटोले, नेपाल तुरकर, बाळकृष्ण भुते, सुनील निनावे, अरुण बघेले, आदेश बोंबडे, प्रेमलाल हातझाडे, हरिदास धावडे, संतोष खंडारे, विनय धुमनखेडे, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, एन. डी. शिवरकर, शिवम् घोडीचोर, विठ्ठल हारगुडे, योगेश पुडके, मंगेश नंदनवार, यशपाल बघमारे, रवी उगलमुगले, लोकेश गायकवाड, संजय झंजाळ तथा असंख्य शिक्षक बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढील रूपरेषेबाबत व नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी विविध निर्णयसुद्धा एकमताने घेण्यात आले.

Web Title: Admission to All Maharashtra Primary Teachers Association