आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान पळविले
By Admin | Updated: July 12, 2014 23:31 IST2014-07-12T23:31:46+5:302014-07-12T23:31:46+5:30
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्राप्त अनुदान दोन जणांनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान पळविले
भंडारा : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्राप्त अनुदान दोन जणांनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
माहितीनुसार तुमसर तालुक्यातील आंबागड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता बापूजी आदिवासी आश्रम शाळा कार्यान्वित आहे.
या आश्रमशाळेला शासनाच्या आदिवासी विभागाकडून १०० टक्के अनुदान प्राप्त होतो. प्राप्त झालेला अनुदान निधी दोन जणांनी आपण संस्थेचे अध्यक्ष व सचिव असल्याचे दर्शवून प्रकल्प कार्यालय भंडारा येथून पळवून नेले.
या प्रकरणात ५ लक्ष ९५ हजार रुपयांचा धनादेश दोन्ही आरोपींनी खोटे दस्तावेज व खोटे शिक्के तयार करुन शासनाची दिशाभूल करुन पळवून नेले.
ही आश्रमशाळा गंगाबाई शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित आहे.या संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव शेंडे रा. गोंदिया हे आहेत.
परंतु खेमराज धोंडू कापगते रा. अंगुरबगिचा (गोंदिया) व राजू बालाजी सेलोकर रा.तुमसर यांनी बनावट दस्तावेज व शिक्के तयार करुन स्वत:ला संस्थेचे अध्यक्ष व सचिव दर्शविले.
तसेच प्रकल्प कार्यालय भंडारा येथे येऊन शासकीय अनुदानाची अफरातफर करण्याच्या हेतूने ५ लक्ष ९५ हजार ३५४ रुपयांचे धनादेश पळवून घेतले.
दि. १० जुलै २०१३ रोजी बनावट दस्तऐवजांच्या आधारे तुमसर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून खाता उघडून धनादेश वटवून घेतला. या आशयाची बाब संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव शेंडे यांच्या लक्षात येताच दि. १३ जुलै २०१३रोजी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ३२, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
कापगते व सेलोकर यांनी जामिनासाठी न्यायालयात २५ जून २०१४ रोजी अर्ज सादर केला असता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. दोघेही फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक अभय जाधव करीत आहेत. (स्घानिक प्रतिनिधी)