कार्यकर्त्यांनो, निवडणुकीच्या कामासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST2021-03-09T04:37:31+5:302021-03-09T04:37:31+5:30

मोहाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षबांधणी करावी, तसेच निवडणुकीच्या कामाला ...

Activists, get ready for election work | कार्यकर्त्यांनो, निवडणुकीच्या कामासाठी सज्ज व्हा

कार्यकर्त्यांनो, निवडणुकीच्या कामासाठी सज्ज व्हा

मोहाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षबांधणी करावी, तसेच निवडणुकीच्या कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकर्त्यांची सभा खोडगाव येथे झाली. त्या सभेत नाना पंचबुंधे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी प्रदेश महासचिव धनंजय दलाल व माजी खासदार मधुकर कुकडे यांनीही मार्गदर्शन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण पडोळे होते.

सभेत भाववाढी चिंता व्यक्त करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल, गॅस, डिझेल व बेरोजगार यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १८ मार्चला तहसीलदार मोहाडी यांच्यामार्फत केंद्र सरकारला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. निवडणुका कशा जिंकता येतील, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सभेला प्रमुख मार्गदर्शक प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी खासदार मधुकर कुकडे, श्रीधर हटवार, कमलेश कनोजे, रिता हलमारे संचालक, नगरसेविका मनीषा गायधने, अनिल काळे, प्रतिमा राकडे, अरविंद येळणे, एकनाथ फेंडर, हरिभाऊ डोये, झगडू बुधे, महादेव पचघरे, किरण अंतकरी, सतीश बांते, राजू उपरकर आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी केले. संचालन विजय पारधी तर आभार विजय बारई यांनी केले.

Web Title: Activists, get ready for election work