जिल्ह्यात आठवडाभरात ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30
भंडारा जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ११५५ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात १८, पवनी १०, तुमसर आणि साकोलीत प्रत्येकी दोन तर लाखनीत आठ असे ४० रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आठवडाभरात ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण दुप्पट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अत्यल्प झाली होती. शंभरच्या आत ॲक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता आठवडाभरात अचानक ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली. सध्या जिल्ह्यात २३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शनिवारी ४० नव्या रुग्णांची भर पडली, तर १४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ११५५ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात १८, पवनी १०, तुमसर आणि साकोलीत प्रत्येकी दोन तर लाखनीत आठ असे ४० रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या २३२ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १११, मोहाडी १४, तुमसर ४८, पवनी १७, लाखनी २७, साकोली १३ आणि लाखांदूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण गत महिन्यात अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र गत तीन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडाऱ्यात रुग्णसंख्या कमी असली तरी नागरिक मात्र बेजाबदारपणे वागत असल्याचे दिसत आहे.
ठाणा येथे एकाच घरी चार कोरोना रुग्ण
जवाहरनगर : भंडारा तालुक्यातील ठाणा येथे एकाच घरी चार कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणा येथील कोरोना रुग्णाच्या परिसरात येणारे व जाणारे सर्व मार्ग तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आले. या भागाच्या सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहे. नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जाण्यास व येण्यास पूर्ण प्रतिबंध करण्यात आला आहे. सदर आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
तुमसर येथे दोन क्षेत्र प्रतिबंधित
तुमसर : कोराना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील दोन नगरातील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे. यात गोवर्धननगर, शास्त्रीनगरातील काही भागांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुमसर येथील गोवर्धननगर व शास्त्रीनगर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यातील गोवर्धन नगरतील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. या क्षेत्रातून नागरिकांना बाहेर ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून, या परिसरात बाहेरील लोकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. या दोन्ही परिसरात स्थानिक प्रशासनाने लाकडी व बांबूचे बॅरिकेट्स लावले आले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनी केले आहे.