नेटवर्किंगतून पैसे चोरणारी टोळी सक्रिय
By Admin | Updated: May 18, 2014 23:21 IST2014-05-18T23:21:41+5:302014-05-18T23:21:41+5:30
जांभोरा येथील निवासी महसूल विभागातील कर्मचारी अनिल वैद्य यांच्या मोहाडी येथील बँक आॅफ इंडियाचे शाखेतून एटीएम नेटवर्किंगद्वारे चारदा पैसे चोरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

नेटवर्किंगतून पैसे चोरणारी टोळी सक्रिय
करडी (पालोरा) : जांभोरा येथील निवासी महसूल विभागातील कर्मचारी अनिल वैद्य यांच्या मोहाडी येथील बँक आॅफ इंडियाचे शाखेतून एटीएम नेटवर्किंगद्वारे चारदा पैसे चोरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. नेटवर्किंगद्वारे बँक खात्यातील पैसे हस्तांतरण करणारी टोळी सक्रिय असताना मोहाडी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांप्रती नाराजी व्यक्त होत आहे. मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील अनिल वैद्य यांचे खाते बँक आॅफ इंडिया शाखा मोहाडी येथे आहे. ते महसूल विभागात कार्र्यरत असून १३ मे २०१४ रोजी दुपारच्या सुमारास बँक खात्यावर वेतन जमा झाले. त्याच रात्री ८.१४ ते ८.३६ वाजता दरम्यान त्यांचे बँक खात्यामधून ४३६० रुपये कमी झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला. सदर खाता एटीएम सेवेशी कनेक्ट आहे. वेळीच त्यांनी करडी पोलिस चौकी गाठली. मात्र ८.४५ वाजता चौकीत कुणीच नसल्याने तेथूनच त्यांनी मोबाईलद्वारे मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. परंतु त्यांना मोहाडी पोलीस स्टेशनला येण्याचा सल्ला देण्यात आल्याने ४५ किलोमीटर अंतर पार करुन रात्रीच मोहाडी गाठली. मात्र तेथूनही त्यांनी भंडारा येथे जाण्याचा सल्ला देण्यात आल्याने अखेर पोलिसांप्रती नाराजी व्यक्त केली. दि. १५ मे रोजी त्यांनी बँकेचे प्रबंधक फुले यांचेकडे घटनेची माहिती दिली असता त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. बँक नेटवर्कवर चौकशी केली असता चोरट्याने एटीएममधून पैसे न काढता सायबर कॅफे नेटवर्किंगद्वारे चारदा पैसे हस्तांतरित केल्याचे निदर्शनास आले. पैसे एटीएम मधून न काढता नेटवर्किंगद्वारे काढण्यात आले. याविषयी अधिक जाणून घेतले असता अनिल वैद्य यांना ६ ते ८ मे च्या दरम्यान ८२ नंबरच्या मोबाईल सिरीजवरुन तिनदा निनावी फोन आले. त्यांनी आपल्या एटीएम कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. पासवर्ड रिनिवल करायचा आहे असे सांगून माहिती जाणून घेतली. त्यातूनच फसगत झाल्याचे बोलले जाते. मात्र आर्थिक सायबर गुन्हा असताना मोहाडी पोलिसांनी दाखविलेली उदासीनता दाखविली. (वार्ताहर)