साकोली तहसीलमधील गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाई

By Admin | Updated: October 13, 2014 23:17 IST2014-10-13T23:17:47+5:302014-10-13T23:17:47+5:30

विधानसभा निवडणुकी दरम्यान कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहू नये, असे स्पष्ट निर्देश आहे. मात्र साकोली तहसिल कार्यालयातील मंगेश मडामे (३०) हा कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Action on the absent staff in Sakoli tehsil | साकोली तहसीलमधील गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाई

साकोली तहसीलमधील गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाई

भंडारा : विधानसभा निवडणुकी दरम्यान कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहू नये, असे स्पष्ट निर्देश आहे. मात्र साकोली तहसिल कार्यालयातील मंगेश मडामे (३०) हा कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
विधानसभा निवडणुपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर राहून कर्तव्य बजवावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. तो कर्मचारी किंवा अधिकारी निवडणुकीच्या कामात हयगय किंवा गैरहजर राहुन कर्तव्यापासून दुर राहिल त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले होत. निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असल्याने सर्वांनी त्यात सहभागी रहावे, अशा सुचना विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना दिले होत. या सुचनांना साकोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी मंगेश मडामे हा अपवाद ठरला.
मडामे हा विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यापासून जाणिवपूर्वक कर्तव्यावर गैरहजर राहुन कसून केला. यामुळे साकोलीचे नायब तहसिलदार दिनकर बाळाराम खोत यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदोजवार करीत आहे. मडामे याच्यावर पोलीस कारवाई करण्यात आल्याने अन्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Action on the absent staff in Sakoli tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.