तुमसरमध्ये ५० दुचाकी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:35+5:30

तुमसर शहरात फळमार्केट, भाजीपाला बाजारात एकच गर्दी होत आहे. शहरातील अनेक जण दुचाकीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन असतानाही बुधवारी मुख्य बाजारात मोठी गर्दी दिसत होती. त्यावरून पोलिसांनी तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Action on 50 Two-wheeler driver in Tumsar | तुमसरमध्ये ५० दुचाकी चालकांवर कारवाई

तुमसरमध्ये ५० दुचाकी चालकांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देकडक कारवाईची शक्यता : मुख्य बाजारपेठेतील तीन स्थळांवर जाण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संचारबंदीत नागरिक रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असून आता त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. शहरातील विविध रस्त्यांवर फिरणाऱ्या ५० दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मुख्य बाजारपेठेतील तीन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
तुमसर शहरात फळमार्केट, भाजीपाला बाजारात एकच गर्दी होत आहे. शहरातील अनेक जण दुचाकीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन असतानाही बुधवारी मुख्य बाजारात मोठी गर्दी दिसत होती. त्यावरून पोलिसांनी तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तुमसर शहरात वाहनांचा सर्रास वापर सुरु असून संचारबंदी कायद्याचे आता कडक अंमलबजावणी पोलिसांतर्फे पुढील काळात केली जाणार असल्याची माहिती आहे. घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असून विविध कारणे देऊन नागरिक रस्त्यावर येत आहेत. यामुळे पोलिसांचा ताण वाढला आहे. अशा दुचाकी स्वारांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली. चार दिवसापूर्वी १५० दुचाकी ताब्यात घेऊन त्यांना दंड आकारण्यात आला होता. समजही देण्यात आली होती. परंतु येथे नियमांचा भंग करणे सुरु आहे. त्यामुळे आता पोलीस आणि प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळा बाहेर निघणे टाळावे असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु त्यानंतरही नागरिकांमध्ये कोरोनाविषयी गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे कठोर कारवाईशिवाय पर्याय दिसत नाही.

Web Title: Action on 50 Two-wheeler driver in Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.