‘त्या’ आरोपींना आठ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:25 IST2018-02-06T23:25:19+5:302018-02-06T23:25:39+5:30
रविवारच्या मध्यरात्री येथील मुख्य मार्गावरील सहयोग सहकारी पतसंस्था लोखंडी सळीने फोडण्याचा प्रयत्न चार चोरट्यांनी केला होता.

‘त्या’ आरोपींना आठ पर्यंत पोलीस कोठडी
आॅनलाईन लोकमत
आंधळगाव : रविवारच्या मध्यरात्री येथील मुख्य मार्गावरील सहयोग सहकारी पतसंस्था लोखंडी सळीने फोडण्याचा प्रयत्न चार चोरट्यांनी केला होता. पोलीस व गावकºयांच्या सतर्कतेने तीन आरोपींना पकडण्यात आले होते. त्यांना आठ पर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्या दरम्यान उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांच्या तपासाअंती आरोपी शुभम अशोक नंदी (२०) रा.गोंदिया, प्रणय मनोहर पाटील (२०) व पलाश गजानन कापरकर (२१) रा.मोहाडी व इतर अज्ञात तीन यांची चौकशी केली असता शस्त्राने दरोडा टाकण्याची पूर्वतयारी करण्याचा आरोप निश्चित केला. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंवि ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करून लोखंडी गुप्ती व एक लोखंडी फायटर व दुचाकी ताब्यात घेतली. मोहाडी न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरुण गुरनुले, फौजदार संतोषसिंह सोलंकी, विजय मोहनकर, संदीप भगत, लोकेश शिंगाडे, तिलकचंद चौधरी आदी करीत आहेत.