शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कुणाच्या मते सक्षम तर कुणी म्हणतो खायीत लोटणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

देशात सक्षम व्यवस्था कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एक लाख ३१ हजार कोटी ओतण्यात आले. तर रेल्वेसाठी एक लाख १० ...

देशात सक्षम व्यवस्था

कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एक लाख ३१ हजार कोटी ओतण्यात आले. तर रेल्वेसाठी एक लाख १० हजार कोटी व मूलभूत सुविधांसाठी एक लाख १८ हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळेच देशात सक्षम व्यवस्था निर्माण होणार आहे. यासह सक्षम आरोग्य व्यवस्थाही उभी ठाकली आहे. आत्मनिर्भर भारताला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे.

- सुनील मेंढे, खासदार, भंडारा.

लोकाभिमुख अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात कृषी, रस्ते, रेल्वे, मेट्रो यासह गावांसाठी कल्याणकारी योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. ग्रामीण सुधारणांचा हा प्रयत्न आहे. विकासाचा दर उंचावणारा व सर्व क्षेत्राला संतुलित, प्रगतीसाठी चालना देणारा असा हा अर्थसंकल्प असून लोकाभिमुख आहे.

- डॉ. परिणय फुके, आमदार

विकासाकडे नेणारा

ग्रामीण क्षेत्र निर्माणअंतर्गत ४० हजार कोटी, ॲग्रो क्रेडिटसाठी १६.५ लाख कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला आता ठरलेल्या मजुरीवर शेड्युलमध्ये काम करू शकतील. कोरोना व्हायरससाठी निधीची सोय आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेले आजचे बजेट सर्वसामान्यांसह भारतीयांना विकासाकडे घेऊन जाणारे आहे.

- चरण वाघमारे, माजी आमदार

विश्वासदर्शक बजेट

लोकसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प निश्चितपणे विकासाकडे घेऊन जाणारा आहे. आरोग्य, शेती, महामार्ग निर्मिती यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना कर रिटर्न भरण्यातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. अर्थमंत्र्यांनी सादर केलेले हे बजेट खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी विश्वासदर्शक आहे.

- मुकेश थानथराटे, महामंत्री भाजप

देश विकणारे बजेट

खासगीकरणाअंतर्गत शासकीय कंपन्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पेट्रोल व डिझेलवर कृषीसेस अंतर्गत वाढ झाल्याने हमखासपणे महागाई वाढणार आहे. तरुणांसाठी तथ्यहीन असा हा अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर करून देश विकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

देशाला अधोगतीकडे नेणारा

वित्तमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे. केंद्र सरकार राज्याचे ३८ हजार कोटी जीएसटी देणे बाकी आहे. ते सोडून केंद्र सरकार निवडणूक होणाऱ्या राज्यांवर खैरात वाटत आहे. राजकीय हेतू समोर ठेवून हे बजेट सादर केले असून, देशाला अधोगतीकडे नेणारे ठरणार आहे.

- गौरीशंकर मोटघरे, महासचिव काँग्रेस.

कंबरडे मोडणारे बजेट

मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महागाई वाढीला चालना देणारे असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. सर्वच क्षेत्रांत सर्वांचीच निराशा झाली आहे. लोकाभिमुखपेक्षा स्वहित असे हे बजेट आहे.

- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष रा. काँ.