शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

ट्रक-टिप्परच्या धडकेनंतर इंधन टाकीचा स्फोट, चालकाचा आगीत होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 17:22 IST

अपघातानंतर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट हाेऊन आग लागली आणि दोन्ही वाहन बेचिराख झाली. अपघात एवढा भीषण होता की चालकाचा अक्षरश: कोळसा झाला.

ठळक मुद्देभंडारा तालुक्यातील घटना : दोन्ही वाहने बेचिराख

वरठी (भंडारा) : सामोरून येणाऱ्या ट्रकला भरधाव टिप्परने धडक दिल्यानंतर लागलेल्या आगीत टिप्पर चालक जळून खाक झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील दाभा येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट हाेऊन आग लागली आणि दोन्ही वाहन बेचिराख झाली. अपघात एवढा भीषण होता की चालकाचा अक्षरश: कोळसा झाला.

इरफान मोहम्मद असलम शेख (२५) रा. फतेहपुर (उत्तरप्रदेश) हल्ली मुक्काम नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी भंडारा - तुमसर मार्गावरून टिप्पर घेऊन नागपूरकडे जात होता. दाभा गावाजवळ त्याचे नियंत्रण गेल्याने कोळसा घेऊन समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्याच वेळी ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली. ट्रक चालक कसाबसा बाहेर पडला. मात्र टिप्पर चालक जखमी अवस्थेत स्टेरिंगमध्ये अडकल्याने बाहेर पडू शकला नाही. क्षणातच आगीत तो जळून ठार झाला. जवळपास तासभर दोन्ही वाहन पेटत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वरठी ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम ताफ्यासफ घटनास्थळावर दाखल झाले. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत चालकाचा जळून कोळसा झाला होता. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, हवालदार संदीप बांते, घनश्याम गोमासे व नितीन भालाधरे यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल टँकर आणि ट्रकच्या भीषण अपघाताची आठवण

मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात मूल मार्गावरील अजयपूरजवळील रिव्हरव्ह्यूजवळ लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर समोरासमोर धडकले. या अपघातानंतर आगीने बघता बघता भीषण रुप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले होते. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील त्या भीषण घटनेची आठवण करून दिली.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडाराDeathमृत्यू