ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:53+5:30

सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरोडी हे सध्या शेवटचे रेल्वेस्थानक आहे. तुमसर - तिरोडी - कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येत आहे.

Accelerate electrification on British-era railways | ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाला वेग

ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाला वेग

Next
ठळक मुद्देतुमसर - तिरोडी मार्ग । मध्यभारतातून जाणारा महत्वपूर्ण रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड ते तिरोडी या ब्रिटीशकालीन रेल्वे मार्गाचे भाग्य उजाळत असून या मार्गावर विद्युतीकरणाला वेग आला आहे. २०२१ पर्यंत या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होणार आहे. मध्यभारताला जोडणारा हा महत्वपूर्ण रेल्वे मार्ग आहे.
सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरोडी हे सध्या शेवटचे रेल्वेस्थानक आहे. तुमसर - तिरोडी - कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येत आहे. पुढे जबलपूर मध्यप्रदेशात जाणारा हा वेळेची बचत करणारा मार्ग ठरणार आहे. यापूर्वी कोळसा व त्यानंतर डिझल इंजीनवर रेल्वे धावत आहे. पुढील काळात विजेवर येथे रेल्वे धावणार आहे.
ब्रिटीशांनी चिखला, डोंगरी व मध्यप्रदेशातील चिखला खाणीचा शोध लावला. मॅग्निजची उचल करून वाहतुकीसाठी या मार्गावर रेल्वे ट्रॅक तयार केले. काही ठिकाणी दगड फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर आठ लहान मोठे रेल्वेस् थानक आहे. त्यात तुमसर टाऊन, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी हे प्रमुख मोठे स्थानक आहेत. परंतु काही रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वेगाडी या मार्गावर धावते.

आर्थिकदृष्ट्या मजबूत
तिरोडी - कटंगी रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यानंतर आणि विद्युतीकरणानंतर मध्यप्रदेशासोबत आर्थिक व व्यावसायिक संबंध निर्माण होण्यास मदत होईल. नागपूर, जबलपूर असा थेट रेल्वेमार्ग तयार होणार असून तुमसर तालुक्यातील प्रवाशांना याचा फायदा होईल.

Web Title: Accelerate electrification on British-era railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.