आॅनलाईन लॉटरी सेंटरवर धाड

By Admin | Updated: March 10, 2016 00:48 IST2016-03-10T00:48:18+5:302016-03-10T00:48:18+5:30

शहरात मागील काही दिवसांपासून आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली तरुण बेरोजगार लोकांना आमिष दाखवून जुगार खेळ चालविला जात असल्याची चर्चा होती.

Aadhar at the online lottery center | आॅनलाईन लॉटरी सेंटरवर धाड

आॅनलाईन लॉटरी सेंटरवर धाड

३.५ लाखांचे साहित्य जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भंडारा : शहरात मागील काही दिवसांपासून आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली तरुण बेरोजगार लोकांना आमिष दाखवून जुगार खेळ चालविला जात असल्याची चर्चा होती. परंतु आॅनलाईन लॉटरी सेंटर चालविणाऱ्या लोकांकडे लॉटरी सेंटर चालविण्याचा अधिकृत परवाना असल्याबाबत लॉटरी सेंटर मालकांकडून सांगण्यात येत होते. परंतु शहरात आॅनलाईन लॉटरी सेंटरवर आॅनलाईन लॉटरी ही चार अंकी न खेळता फक्त दोन अंकामध्ये खेळवित होते. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज धाड घातली.
सदर प्रकार हा आॅनलाईन लॉटरीमध्ये न मोडता सरळ सट्टापट्टी, मटका या प्रकारात जुगारात मोडत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील मोठा बाजार परिसरातील नगरपरिषद चाळीमधील शर्मा आॅनलाईन लॉटरी दुकान तसेच पोष्ट आॅफीस चौकातील तुरस्कर कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील राजश्री आॅनलाईन लॉटरी सेंटरवर धाड घातली असता दोन्ही आॅनलाईन लॉटरी दुकानात असलेल्या संगणकांवर आॅनलाईन लॉटरी बुकिंगचे काम सुरु होते. सदर दोन्ही आॅनलाईन लॉटरी दुकानात भिंतीवर दोन अंकी चार्ट लिहिलेले दिसून आले. दुकानातील चालू संगणकांची पाहणी केली असता नियमाप्रमाणे चार अंकी आकड्यांवर बुकिंग न होता आॅनलाईन लॉटरी दुकानामधील संगणक आॅपरेटर हे दोन अंकी आकड्यावर लॉटरीची बुकिंग करून त्याचा निकाल समोरच्या भिंतीवरील चार्टवर दोन अंकामध्ये प्रदर्शीत करीत असल्याचे तसेच दोन अंकी आकड्यावर आॅनलाईन लॉटरी लावून त्या मोबदल्यात लोकांकडून पैसे घेऊन आॅनलाईन लॉटरीची जुगार खेळणारे इसम दोन अंकी आकड्यावर दोन रुपयाप्रमाणे युनिट चार्ज घेत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र लॉटरी अधिनियमान्वये चार अंकी लॉटरी घेणे बंधनकारक असताना सुद्धा शेवटचे दोन अंक घेऊन दोन अंकांमध्येच लॉटरी खेळली जाते. गोल्डन आॅनलाईन लॉटरी दुकानाचे मालक जयकुमार श्रीकिशन शर्मा, रा.पटेलपुरा वॉर्ड भंडारा व आॅनलाईन लॉटरी बुकींग करणारे संगणक आॅपरेटर नरेश नंदनवार, रा.बेला, तसेच राजश्री आॅनलाईन लॉटरी दुकानात दोन अंकी आॅनलाईन लॉटरी बुकींग करणारे संगणक आॅपरेटर विजू खेताडे रा.संत लहरी बाबा वॉर्ड, भंडारा, चित्रेश बहेकर रा.बाजार चौक गणेशपूर, कामेश टांगले रा.भोजापूर, गोवर्धन शिवरकर भोजापूर व दोन अंकी आॅनलाईन लॉटरी लावणारे रवी पन्नालाल रगडे रा.कपील नगर, भंडारा, रामकुमार निमजे रा.भगतसिंग वॉर्ड नवीन टाकळी, पुरुषोत्तम सेलोकर रा.रामनगर खात रोड भंडारा, विलास देशकर रा.भगतसिंग वॉर्ड नवीन टाकळी, सैय्यद अकराम सैय्यद मेहमुद अली रा.जमनालाल बजाज वॉर्ड भंडारा, रामरतन पडोळे रा.नेरी, दिलीप खोब्रागडे रा.गणेशपूर भंडारा, दिलीप हटवार रा.भंडारा, सलमान अक्रम खान रा.तकीया वॉर्ड भंडारा या सर्वांवर कारवाई केली. त्यांचेकडून दोन अंकी लॉटरी लावण्याचे संगणक व साहित्य कि. २,७०,००० रु. व नगदी ८१,४३० असा एकुण ३,४९,४५० रु. चा माल जप्त करण्यात आले. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, सपोनि रिजवी, सफौ राहांगडाले, पोहवा मडामे, नंदनवार, राजेश गजभिये, रोशन गजभिये, बबन अतकरी, चेतन पोटे, स्नेहल गजभिये, रमाकांत बोंद्रे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aadhar at the online lottery center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.