आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 05:00 AM2022-06-26T05:00:00+5:302022-06-26T05:00:10+5:30

मीना थावरदास गिडवाणी (५५, रा. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर तुमसर असून आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या तुमसर येथे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मीना बाजारात जात होत्या. दरम्यान त्या मोबाईलवर बोलत रस्ता पार करीत होत्या. त्यावेळी ट्रकने (क्र. एमएच ३५ के ५७२५) जबर धडक दिली. त्याखाली कोसळल्या.

A woman who was visiting her sick parents was killed in a truck crash | आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेल्या महिलेला ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. घटना तुमसर येथील शिवाजीनगरातील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. बाजारात जाताना मोबाईलवर बोलणे महिलेच्या जीवावर बेतले.
मीना थावरदास गिडवाणी (५५, रा. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर तुमसर असून आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या तुमसर येथे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मीना बाजारात जात होत्या. दरम्यान त्या मोबाईलवर बोलत रस्ता पार करीत होत्या. त्यावेळी ट्रकने (क्र. एमएच ३५ के ५७२५) जबर धडक दिली. त्याखाली कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. चालकाने घटनास्थळापासून वाहनासह पळ काढला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वाहनचालक दिनेश्वर पाटील (३१, रा. छोटा रजेगाव, गोंदिया) याला अटक केली. वाहनचालकावर गुन्हा नोंदिवला आहे.

 

Web Title: A woman who was visiting her sick parents was killed in a truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात